शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

५२५ पाण्याचे स्रोत दूषित

By admin | Updated: May 11, 2015 00:30 IST

जिल्ह्यात गॅस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाने थैमान घातल्याच्या वार्ता कानी पडताच आरोग्य विभाग खळबडून जागा झाला. ...

नरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात गॅस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाने थैमान घातल्याच्या वार्ता कानी पडताच आरोग्य विभाग खळबडून जागा झाला. गोंदिया जिल्ह्यातील ५२५ ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सोबतच गॅस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाने ग्रस्त असलेल्या ५९० रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.जिल्हा प्रयोगशाळेतर्फे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात ९९६० पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यात ५२५ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळले आहे. एकट्या एप्रिल महिन्यात ९५ पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. परिणामी गोंदिया जिल्ह्यात ग्रेस्ट्रोचे ११४ रुग्ण, डिसेंट्रीचे २४० रुग्ण, डायरीयाचे २३६ रुग्ण गोंदिया जिल्ह्यात आढळले आहेत. तसेच टायफाईडचे १२४ रुग्ण या चार महिन्यात आढळल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. तिरोडा तालुक्यातील सुकडी (डाकराम) व ठाणेगावात डायरियाने थैमान घातल्याच्या बातम्या येताच आरोग्य समितीने सभा घेतली. या सभेत गोंदिया जिल्ह्यातील ५२५ पाण्याचे स्त्रोत दूषित असल्याची माहिती पुढे आली असून गेस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाचे थैमान जिल्ह्यात सुरू आहेत. साथ रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. एकट्या एप्रिल महिन्यात ४३० पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले आहेत. पाण्यामुळे विविध आजार जडतात यासाठी नागरिकांना जनजागृती करणारे उपक्रम आरोग्य विभागाने ठोसपणे राबविले नाही. जिल्ह्यातील १५७०२ जणांच्या रक्ताचे नमुने हिवताप कार्यालयाने घेतले. त्यात एप्रिल महिन्यात ३२ जणांना मलेरिया असल्याचे लक्षात आले. चार महिन्यात मलेरियाचे २३३ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. अशा दिल्या लस प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत मार्चमध्ये २१ हजार ७३ प्रसूतीपूर्व नोंदणी करण्यात आली. यापैकी १७ हजार १७२ गरोदर मातांना धनुर्वात लस देण्यात आली. डीपीटी व पोलीओची मात्रा १९ हजार ६३९ जणांना देण्यात आली. १९ हजार ७७८ जणांना गोवरची लस देण्यात आली. जीवनसत्व अ १९ हजार ३२२ बालकांना देण्यात आले. १७ हजार ७१ मातांना लोहयुक्त गोळ्या देण्यात आल्या. विविध प्रकारच्या लस देण्यात आल्या आहेत.८४२६ बालके कुपोषितकुपोषण मुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न शासन पाहत असले तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र कुपोषण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने ७९ हजार २४१ बालकांची तपासणी केल्यावर ७ हजार २४४ बालके कमी वजनाचे तर १ हजार १८२ बालके तीव्र कुपोषित असल्याचे लक्षात आले आहे. कर्मचाऱ्यांवर होणार कारवाईकुटुंब कल्याणचे ५० टक्केपेक्षा कमी उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य समितीत घेण्यात आला आहे. ज्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरुन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्याचे निर्देश दिले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव व सुकडी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी कुटुंबकल्याणचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.नागरिकांनी पाणी पितांना काळजी घ्यावी. उन्हाळ्यात बर्फाचे पाणी पिऊ नये. दूषित पाण्यामुळे बर्फ तयार केला जाऊ शकतो.ठाणेगावात डायरीयाचे रूग्ण आढळले. ज्यांनी बर्फाचे पाणी पिल्ले त्यांनाच डायरीया झाला. दूषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यासाठी स्वच्छ पाणी पिऊन आरोग्य सुदृढ ठेवावे. गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळेल यासाठी ग्राम पंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. डॉ. हरीश कळमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गोंदिया.