तिरोडा येथे ५२ महिलांची कोलपोस्कोपी तपासणी

By Admin | Updated: March 13, 2015 01:48 IST2015-03-13T01:48:55+5:302015-03-13T01:48:55+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला आरोग्य अभियानांतर्गत महिला आरोग्य पंधरवाड्यात कोलस्कोपी शिबिर पार पडले.

52 women's collopscopy inspection at Tiroda | तिरोडा येथे ५२ महिलांची कोलपोस्कोपी तपासणी

तिरोडा येथे ५२ महिलांची कोलपोस्कोपी तपासणी

तिरोडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला आरोग्य अभियानांतर्गत महिला आरोग्य पंधरवाड्यात कोलस्कोपी शिबिर पार पडले. या शिबिरात गर्भाशय व तोंडाचा कर्करोग तसेच श्वेत पदरची दुर्बिनद्वारे तपासणी करण्यात आली. यात ५२ महिलांची मोफत कोलपोस्कोपी करण्यात आली.
याशिवाय शिबिरात १७२ महिलांची नेत्ररोग तपासणी, ५६ महिलांची दंतरोग तपासणी, रक्तदाब, मधुमेह, एचआयव्ही, ह्रदयरोग व आयुषद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात आली. ९८४ महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिर नगर परिषद तिरोडा, अदानी फाऊंडेशन तिरोडा, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, भगिनी बहुउद्देशिय महिला मंडळ, लॉयनेस क्लब तिरोडा, सखीमंच तिरोडा, महिला मानव विकास समिती तिरोडा, तालुका वैद्यकीय अधिकारी तिरोडा व तिरोडा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
तत्पूर्वी नगराध्यक्ष अजय गौर यांच्या अध्यक्षतेखाली आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अतिथी म्हणून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जे.एल. दुधे, नगर परिषद तिरोड्याचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.आर. टेंभुर्णे, सलीम जवेरी, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शेफाली जैन, डॉ. स्वाती विद्यासागर, डॉ. सुनिता लढ्ढा यांची उपस्थिती होती.
सदर शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर म्हणून स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शैफाली जैन, डॉ.सुनिता लढ्ढा, डॉ. स्वाती विद्यासागर, डॉ. सोनम लढ्ढा, डॉ. रेखा दुबे, डॉ. प्रतिभा पारधी, डॉ. कंचन रहांगडाले, डॉ. प्राची मिश्रा, डॉ. स्मिता राऊत, दंतरोग तज्ज्ञ डॉ. नागेश शिवारी यांनी आपली सेवा दिली. शिवाय डॉ. अर्चना गहेरवार, डॉ. प्रिया ताजने, डॉ. श्रद्धाजंली चौधरी, डॉ. सुनिता भोयर, डॉ. शील घडले, डॉ. आशिष बन्सोड व डॉ. निलेश लोथे यांनीही महिलांची आरोग्य तपासणी केली.
या वेळी काही महिलांचा त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नृत्याचा रंगारंग कार्यक्रमही महिलांनी सादर केला. संचालन देवका उरकुडे व राखी गुणेरिया यांनी संयुक्तपणे केले. प्रास्ताविक ममता बैस यांनी तर आभार शाईतबेग मिर्झा यांनी मानले. शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 52 women's collopscopy inspection at Tiroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.