५२ टक्के विद्यार्थी घेताहेत ऑनलाईन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST2021-07-27T04:30:53+5:302021-07-27T04:30:53+5:30
नरेश रहिले गोंदिया: जिल्ह्यातील जि.प.च्या १०३९ व खासगीच्या ५१६ अशा १५५५ शाळा सुरू झाल्या आहेत. यापैकी १२५७ शाळा ऑनलाईन ...

५२ टक्के विद्यार्थी घेताहेत ऑनलाईन शिक्षण
नरेश रहिले
गोंदिया: जिल्ह्यातील जि.प.च्या १०३९ व खासगीच्या ५१६ अशा १५५५ शाळा सुरू झाल्या आहेत. यापैकी १२५७ शाळा ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख १५ हजार ३२६ असून यापैकी १ लाख १२ हजार ९३३ विद्यार्थी आजघडीला ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. गोंदिया जिल्ह्यात ५२.४५ टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात प्राथमिक विभागातून जि.प.चे ६३ हजार ४३२ तर खासगीचे २२ हजार ९८ विद्यार्थी, माध्यमिक विभागातून खासगीचे १२ हजार ३८२ विद्यार्थी तर उच्च माध्यमिक विभागातून खासगीचे १५ हजार २१ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील ६३ हजार ४३२ तर खासगी मधील ४९ हजार ५०१ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
...................
जिल्ह्यात एकूण शाळा-१५५५
ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा- १२५७
एकूण विद्यार्थी-२१५३२६
प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती-८५२९५
ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी-११२९३३
.................
८५२९५ विद्यार्थी शाळेत
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. माध्यमिक शाळेत जि.प.चे ८९८ तर खासगीचे १६ हजार २३१ विद्यार्थी शाळेत पोहचले. उच्च माध्यमिकचे जि.प.शाळेतील ७ हजार ८८२ विद्यार्थी तर खासगीचे ६० हजार २८४ विद्यार्थी शाळेत पोहचले आहेत.
..........