शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

दोन आयसोलेशन कक्षात ४९ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३५७ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.

ठळक मुद्दे५७ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात : ३५७ जणांचे नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. तसेच त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. सध्या दोन आयसोलेशन कक्षात ४९ जण उपचार घेत आहे. जिल्ह्यात मागील ३७ दिवसात एकही कोरोना बाधीत रुग्ण न आढळल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३५७ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यास मदत झाली असून मागील ३७ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन सुध्दा शिथिल करण्यात आले असून सर्व व्यवहार आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल केले जात आहे. गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमधील आयसोलेशन कक्षात ४८ आणि आमगाव येथे १ असे ४९ जणांवर उपचार सुरू आहे. तर जिल्ह्यातील सात शासकीय क्वारंटाईन कक्षात ५७ व्यक्ती उपचार घेत आहेत. यात चांदोरी ४, लईटोला ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, उपकेंद्र बिरसी ७ , शासकीय आदिवासी आश्रमशाळा इळदा २६, समाजकल्याण निवासी शाळा डव्वा ७ आणि जलराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४ असे एकूण ५७ उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या