शिरपूर सीमा तपासणी नाक्यावर उघडकीस आली ४.६५ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:20+5:302021-01-25T04:30:20+5:30
जगदिश सोनीराम बालपांडे (३१, रा. बिनिकी ले-आउट, नागपूर) हे ट्रक क्रमांक एमएच ४०-वाय ९११२ मध्ये हिमालय कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट ...

शिरपूर सीमा तपासणी नाक्यावर उघडकीस आली ४.६५ लाखांची चोरी
जगदिश सोनीराम बालपांडे (३१, रा. बिनिकी ले-आउट, नागपूर) हे ट्रक क्रमांक एमएच ४०-वाय ९११२ मध्ये हिमालय कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट खाकी रंगाच्या ११०३ नग बॉक्समध्ये असा १८ लाख सात हजार ९०५ रुपयांचा माल भरून रांची-झारखंड (छत्तीसगड) जाण्याकरिता निघाले होते. २२ जानेवारी रोजी नागपूर हर्ष मीनी ट्रान्सपोर्ट कापसी नागपूरसमोर मोकळ्या जागेत ट्रक उभा करून स्वत:च्या घरी जेवण करून परत रायपूरकरिता ते निघाले. २३ जानेवारी रोजी शिरपूर सीमा तपासणी नाक्यावर मालाचे वजन कमी झाल्याचे त्यांना दिसले. यावर ते पाहणी करण्यास गेले असता, ३१७ बॉक्स म्हणजेच अंदाजे चार लाख ६५ रुपयांचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले. देवरी पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.