शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये ४६२ स्थलांतरित बालके दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यातील कायमचे रहिवासी असणाऱ्या परंतु व्यवसाय, शेती, शिक्षण व इतर कामानिमित्त इतर राज्य अथवा जिल्ह्यामध्ये गेलेले नागरिक कुटुंबासह स्वगावी परत येत आहेत. त्यांच्यासोबत लॉकडाऊनच्या काळात ६ ते १४ वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ९ मे पासून बाहेरून आलेल्या स्थलांतरीत व्यक्तींची माहिती चेकपोस्टवर घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरटीई अंतर्गत अधिकार : गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात आणि राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी इतर राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिक स्वगावी येत आहेत व जात आहेत. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात स्थलांतरीत होऊ आलेले ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य बालकांना नियमित शाळेत दाखल करण्यात येणार आहे. मे महिन्यात ४६२ बालके ही स्थलांतर होऊन गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली आहेत.गोंदिया जिल्ह्यातील कायमचे रहिवासी असणाऱ्या परंतु व्यवसाय, शेती, शिक्षण व इतर कामानिमित्त इतर राज्य अथवा जिल्ह्यामध्ये गेलेले नागरिक कुटुंबासह स्वगावी परत येत आहेत. त्यांच्यासोबत लॉकडाऊनच्या काळात ६ ते १४ वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ९ मे पासून बाहेरून आलेल्या स्थलांतरीत व्यक्तींची माहिती चेकपोस्टवर घेण्यात येत आहे. इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून गोंदियामध्ये आलेल्या कुटुंबाचीे माहिती चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या शिक्षक-कर्मचारी यांनी माहिती घेतली आहे. ६ ते १४ वयोगटातील बालके ९ ते ३१ मे २०२० या कालावधीत पोहचली त्या बालकांना जिल्ह्यात दाखल झाल्यापासून १४ दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे १४ दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर सदर बालकांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करण्यात यावेत अश्या सूचना देण्यात आल्यात आल्या. ज्या बालकांना नियमीत शाळेत दाखल करण्यात आले नाही त्यांना दाखल करावे अश्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. सदर बालकास जवळच्या नियमित शाळेत दाखल करून सदर बालकास कोणत्या शाळेत व कोणत्या वर्गात दाखल केले याची माहिती सादर करावी,अशा सूचना जिल्हा परिषदेने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.स्थलांतरित होऊन आलेली ६ ते १४ वयोगटातील बालके शाळेत दाखल झाली नसल्यास सदर विद्यार्थ्यांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करून घ्यावे. सदर विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्र प्रपत्रामध्ये सादर करावी. विद्यार्थ्यांचा शोध घेताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत:ची आरोग्य विषयक काळजी घेवून शिक्षक विद्यार्थ्यांना दाखल करावे.- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी