एचआयव्ही पॉझिटिव्ह ४४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST2021-01-13T05:17:00+5:302021-01-13T05:17:00+5:30
गोंदिया : मातेच्या पोटातच आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असताना अख्खे जीवनच यातनामय होणार होते. जग पाहण्यापूर्वीच गंभीर ...

एचआयव्ही पॉझिटिव्ह ४४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
गोंदिया : मातेच्या पोटातच आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असताना अख्खे जीवनच यातनामय होणार होते. जग पाहण्यापूर्वीच गंभीर आजार घेऊन जन्माला येण्याच्या तयारीत असलेल्या बालकांना एचआयव्ही मुक्त करण्याची तयारी गोंदियाच्या एड्स नियंत्रण सोसायटीने केली. त्यांच्या या तयारीला ९६ टक्के यश आले. एचआयव्ही बाधित आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला एचआयव्ही होऊ नये म्हणून घेतलेली काळजी यशस्वी राहिली. एचआयव्ही बाधित मातेच्या पोटात राहूनही एचआयव्हीमुक्त म्हणून ४४ बालके जन्माला आली आहेत.
मागील चार वर्षात ४६ एचआयव्ही पॉझिटिव्ह मातांची प्रसूती झाली. त्यांच्या पोटातील ४४ बाळांना एचआयव्ही मुक्त करण्यात आले. जनजागृतीमुळे व घेतलेल्या काळजीमुळे एचआयव्हीचे प्रमाण घटत आहे. ४६ बालकांपैकी ४४ बालके एचआयव्हीमुक्त झाले. सन २०१७-१८ मध्ये १२ बालके,सन २०१८-१९ मध्ये १७ बालके, सन २०१९-२० मध्ये १३ बालके, सन २०२०-२१ मध्ये दोन बालके एचआयव्हीमुक्त असल्याचे पुढे आले आहे.
....
जिल्ह्यातील ६६ महिला आढळल्या बाधित
गोंदिया जिल्ह्यात मागील चार वर्षात ४६ एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती मातांची प्रसूती करण्यात आली. त्यांच्या पोटातील ४४ बाळांना एचआयव्ही मुक्त करण्यात आले. दोन गर्भवती मातांच्या पोटातील बाळांना एचआयव्ही असल्याचे पुढे आले.
गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी
एचआयव्ही बाधित असलेल्या मातांनी सुरुवातीपासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. आहारापासून तर औषधांपर्यंतच्या बाबी वेळोवेळी करणे आवश्यक आहे.डाॅक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावा.
एचआयव्ही बाधित महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या घरातील मंडळींचे देखील समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या आहारापासून त्यांची प्रसूती होईपर्यंत सर्वच प्रकारची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. सोबत जेथे गरज आहे तेथे एड्स नियंत्रण सोसायटीने मदतही केली आहे.
- संजय जेणेकर, जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी,गोंदिया.
जिल्ह्यातील १६९३ एचआयव्हीबाधित फक्त औषधावर जगतात
सन तपासणी बाधित रूग्ण
२०१७-१८ ३४२३१ १६५
२०१८-१९ ३६९८५ ११९
२०१९-२० ४५७६० १००
२०२०-२१ १८४४४ १७
एकूण १३५४२० ४०१