७५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:23+5:30

गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते.

4,000 students uniforms uniforms | ७५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

७५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

ठळक मुद्देदुसऱ्या गणवेशाचे २ कोटी २६ लाख रुपये अडले : विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाचे दिले पैसे

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गरीब श्रीमंत अशी दुफळी दूर करण्यासाठी शासनाने शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याचे नियम लावले.जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येतात. यासाठी एका गणवेशाकरिता ३०० रूपये असे दोन गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासनाकडून दिले जाते. मात्र यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीकडे वळते करण्यात आली. परंतु ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांचा दुसऱ्या गणवेश देण्यासाठी आतापर्यंत शासनाने पैसे दिलेच नसल्याची बाब पुढे आली आहे.
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते. परंतु शाळा सुरू होऊन तीन महिने लोटत असतांना एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांनाकडे वळते करण्यात आले. त्यातही अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यातच आले नाही.
दुसºया गणवेशाची रक्कम शासनाकडून शिक्षण विभागाला आलीच नाही.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे देण्यात आले नाही.
गोंदिया जिल्ह्यात जि.प.शाळांत शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार ५३६ मुली, अनुसूचित जातीचे ४ हजार ५४४ मुले, अनुसूचित जमातीचे ६ हजार ७१९ मुले व दारिद्रय रेषेखालील २२ हजार ४७७ मुले अशा एकूण ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश द्यायचे होते. दोन गणवेशापैकी एका गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितींच्या खात्यात टाकल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सांगत आहेत.
परंतु अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. गणवेशाचे पैसे मिळाले तर विद्यार्थ्यांना निदान एक गणवेश तरी आतापर्यंत का देण्यात आला नाही. दुसऱ्या गणवेशाच्या रकमेसाठी शासनाकडून कार्यवाही का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
२ कोटी २६ लाख रुपयांची गरज
जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश देण्यासाठी २ कोटी २५ लाख ८२ हजार ८०० रूपयाची गरज आहे. एवढा निधी शासनाने पाठविल्याशिवाय दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना देता येणार नाही. एका गणवेशामागे ३०० रूपये शासन देत आहे. परंतु तेही गणवेशाची रक्कम शाळा सुरू होऊनही दिली नसल्याने काही ठिकाणचे विद्यार्थी आठवडाभर एकाच गणवेशात शाळेत जातात. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समित्यांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही.

Web Title: 4,000 students uniforms uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा