४ लाख ३५ हजार नमुन्यांची चाचणी; पॉझिटिव्ह ४१ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:29+5:302021-07-29T04:29:29+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २१८२३८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१७३०१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन अशा एकूण ४ लाख ३५५३९ ...

४ लाख ३५ हजार नमुन्यांची चाचणी; पॉझिटिव्ह ४१ हजार
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २१८२३८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१७३०१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन अशा एकूण ४ लाख ३५५३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४११८६ नमुने कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०४७५ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आहे.
जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निश्चितच ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.२८) ५९४ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ५०१ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ३ नमुने कोरोना बाधित आढळले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.५० टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११८६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०४७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
..................
५ लाख ७५ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील १९० केंद्रांवरुन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु असून आतापर्यंत ५ लाख ७५ हजार ८५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
..................
संसर्ग आटोक्यात; निर्बंध शिथिल करा
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कोरोनाचे निर्बंध शिथिल करुन बाजारपेठ रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांकडून केली जात आहे.