कत्तलखान्यात जाणाऱ्या ३७ गुरांची सुटका
By Admin | Updated: September 8, 2016 00:26 IST2016-09-08T00:26:43+5:302016-09-08T00:26:43+5:30
निदर्यपणे गुरांंना दोन ट्रकमध्ये कोंबून त्यांन कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकला देवरी पोलिसांनी नाकेबंदी करून पकडले.

कत्तलखान्यात जाणाऱ्या ३७ गुरांची सुटका
दोन ट्रक जप्त : चिचगड-देवरी मार्गावरील कारवाई
देवरी : निदर्यपणे गुरांंना दोन ट्रकमध्ये कोंबून त्यांन कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकला देवरी पोलिसांनी नाकेबंदी करून पकडले. यात ३७ गुरांची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आली. ही कारवाई रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, देवरी पोलिसांना गुरांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची सूचना मिळाली होती. त्यानुसार चिचगड-देवरी या राज्य महामार्गावर पोलिसांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास नाकेबंदी केल्यानंतर दोन ट्रक गुरांना कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
ट्रक एमएच ३५, के १२९८ तसेच एमएच ०८, एच ६५७७ यांना जप्त करण्यात आले. दोन ट्रकसह त्यातील गुरे मिळून ११ लाख २० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी वसीम बसीर शेख रा.देवरी आणि सुभाष श्यामलाल जनबंधू रा.एडमागोंदी (चिचगड) यांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या गायींना लाखनी येथील गौरक्षण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. शेडगे करीत आहे.(प्रतिनिधी)