शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

शासनाने यंदा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढणे ऐच्छिक केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक विमा काढण्याकरिता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांनी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असलेल्या जिल्ह्यातील बरेच शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्यासाठी जात आहे.

ठळक मुद्देऑनलाईन सातबाराची अट : सातबारा अपलोड न केल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक संकटापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पिकांचा विमा उतरवितात. मात्र विमा कंपनीने पीक विमा काढण्यासाठी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. त्यामुळे ऑनलाईन सातबारा नसलेले जिल्ह्यातील तीन हजारावर शेतकऱ्यांवर पीक विमा काढण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने यावर हात झटकल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.शासनाने यंदा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढणे ऐच्छिक केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक विमा काढण्याकरिता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांनी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असलेल्या जिल्ह्यातील बरेच शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्यासाठी जात आहे. पण ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन आहे केवळ त्याच शेतकऱ्यांचा पीक विमा काढला जात आहे.पण ज्या शेतकऱ्यांकडे ऑनलाईन सातबारा नाही त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे.गोंदिया तालुक्यातील दासगाव, कंटगी, जब्बारटोला परिसरातील शेतकरी पीक विमा काढण्यासाठी ऑनलाईन सातबारा काढण्याकरिता ग्राहक सेवा केंद्रावर जात आहे. पण तिथे गेल्यावर संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे सातबारा अद्याप महसूल विभागाने अपलोड केले नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.जवळपास गोंदिया तालुक्यातील तीन हजारावर शेतकऱ्यांचे सातबारा अद्याप ऑनलाईन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. याला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा दुजोरा दिला आहे. विमा कंपन्या ऑनलाईन सातबारा असल्याशिवाय विमा काढण्यास नकार देत आहे. त्यातच ३१ जुलै ही पीक विमा काढण्याची अंतीम तारीख आहे.त्यामुळे शेतकºयांची अडचण वाढली असून बँका, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर हात झटकल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.ऑफलाईन सातबारा पीक विमा काढण्यास अडचण कायविमा कंपन्या आणि बँका पीक विमा काढण्यासाठी ऑनलाईन सातबाऱ्याची अट पुढे करुन पीक विमा काढण्यास नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता ऑफलाईन सातबारावर पीक विमा काढण्यास नेमकी अडचण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.मी ग्राहक सेवा केंद्रात ऑनलाईन सातबारा काढण्यासाठी गेलो मात्र सातबारा ऑनलाईन नसल्याचे सांगितले. तर विमा कंपनीकडे ऑफलाईन सातबारा घेवून गेलो असता त्यांनी या सातबारावर पीक विमा काढता येत नसल्याचे सांगून परत पाठविले. त्यामुळे आता पीक विमा काढण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.- बाबुलाल बिसेन, शेतकरी कंटगी.....................................ऑफलाईन सातबाराधारक शेतकऱ्यांचा पीक विमा निघत नसल्याच्या तक्रारी गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहे. ही बाब कृषी आयुक्तालयाला कळविण्यात आली. यावर ३१ जुलैपूर्वी तोडगा न निघाल्यास हे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतील. यासंदर्भात शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई केली जाईल.- प्रमोद पाटील, विभागीय नियंत्रक, रिलायन्स विमा कंपनी.

टॅग्स :agricultureशेती