३0 प्रवासी आढळले विना तिकीट

By Admin | Updated: June 2, 2014 01:17 IST2014-06-02T01:17:20+5:302014-06-02T01:17:20+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये विना तिकीट प्रवास करताना महामंडळाच्या पथकाला

30 passengers without ticket found | ३0 प्रवासी आढळले विना तिकीट

३0 प्रवासी आढळले विना तिकीट

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये विना तिकीट प्रवास करताना महामंडळाच्या पथकाला ३0 प्रवासी आढळले. पैसे देऊनही या प्रवाशांना तिकीट देण्यात आली नसल्याचा हा प्रकार होता व याप्रकरणी महामंडळाच्या पथकाने तीन वाहकांवर कारवाई केली आहे. पथकातील अधिकार्‍यांनी या तिघांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असून आता या तिघांवर काय कारवाई होते, याकडे अन्य कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

१५ ते ३१ मे दरम्यान राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक ए.एल. वरठे यांच्या मार्गदर्शनात विशेष मार्ग तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी विभागीय वाहतूक अधिकारी एस.एम. गभणे यांनी आठ पथक तयार केले होते. सहायक वाहतूक निरीक्षक असलेल्या पथकाने एसटी बसेसची आकस्मिक तपासणी केली असता त्यांना डोमाटोला (बिजेपार) येथे जात असलेल्या बस मध्ये २२ प्रवासी विना तिकीट आढळून आले होते.

प्रवाशांना विचारले असता त्यांनी वाहक किशोर खोटेले यांना तिकीटचे पैसे दिल्याचे सांगीतले. तर असाच प्रकार डोंगरगडकडे जात असलेल्या बस मध्येही आढळून आला. त्यात चार प्रवाशांनी वाहक दीपमाला कडूकर यांना तर देवरी येथून परत येत असलेल्या बस मध्ये सुद्धा चार प्रवाशांनी वाहक त्रिवेणी नांदगावे यांना तिकीटचे पैसे दिल्याचे सांगीतले. अशा प्रकारे पथकाला तीन बसेसमध्ये एकूण ३0 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले.

प्रकरणी सहायक वाहतूक निरीक्षकांनी या तिन्ही प्रकरणांचा अहवाल तयार करून विभागीय वाहतूक अधिकारी गभणे यांच्याकडे पाठविला आहे. आता त्यावर गभणे काय कारवाई करतात याकडे अन्य कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे पैसे घेऊन तिकीट न देता पैशांच्या अपहार प्रकरणात आगारातील सहा वाहक निलंबीत करण्यात आले आहेत. तरिही वाहकांचे मनसुबे एवढे वाढलेले असल्याने अधिकारी याबाबत आश्‍चर्य व्यक्त करतात. तर अशा या प्रकरणांमुळे महामंडळाला मात्र चांगलाच फटका बसत असल्याचे चित्र दिसून येते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 30 passengers without ticket found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.