जाळपोळ प्रकरणात २७२ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:35 IST2018-10-18T00:33:41+5:302018-10-18T00:35:56+5:30
गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सर्प दंशाने मृत्यू पावलेल्या आदित्य सुमेध गौतम (८) याला जिवंत करण्याची हमी देणाऱ्या डॉक्टरला उपचार का करू देत नाही म्हणून संतप्त लोकांनी गोरेगाव येथील दुर्गा चौकात जाळपोळ करून पोलिसांवर दगडफेक केली.

जाळपोळ प्रकरणात २७२ जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सर्प दंशाने मृत्यू पावलेल्या आदित्य सुमेध गौतम (८) याला जिवंत करण्याची हमी देणाऱ्या डॉक्टरला उपचार का करू देत नाही म्हणून संतप्त लोकांनी गोरेगाव येथील दुर्गा चौकात जाळपोळ करून पोलिसांवर दगडफेक केली.
या दगडफेक करणाºया २७२ लोकांवर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.१४ आॅक्टोबर रोजी गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सर्प दंशावर उपचार करण्यासाठी दाखल झालेल्या आदित्य सुमेध गौतम (८) याचा मृत्यू झाला. १५ आॅक्टोबरला त्याला अंत्यसंस्कारासाठी नेत असताना कटंगीधाम येथील डॉ.नवीन लिल्हारे याने त्याला जीवंत करून देतो मला जडीबुटी आणण्यासाठी वेळ द्या असे म्हटले. सोमवारी रात्री ११ वाजता जडीबुटी घेऊन लिल्हारे आदित्यच्या घरी पोहचला.
त्यावेळी चमत्काराचा प्रयोग करून लोकांची फसवणूक केल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु त्याला सोडण्यात यावे यासाठी पोलिसांविरूध्द नागरिकांनी आंदोलन उभे करून रस्ता रोको जाळपोळ व दगडफेक केली. पोलीस प्रशासन मुर्दाबाद अश्या घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या. जमावाने बस क्र.एमएच ४० ए.क्यू.६१५० ची तोडफोड करून बसला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या दगड फेकीत मनोज शयामलाल बोपचे (३०) रा. कालीमाटी हा जखमी झाला. या प्रकरणात आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ३५३, ३३२, ४२७ सहकलम ७ क्रिमीनल लॉ मेंडमेंट कायदा, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, सहकलम १३५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यांच्यावर केला गुन्हा दाखल
या प्रकरणात सहेसराम गनिराम चौधरी, राजकुमार शिवचरण नेवारे, संजय प्रेमलाल राऊत, रजत उत्तम डोंगरे, शैलेश दार्वेकर, किसन राऊत, गोविंद रहांगडाले, नानेश्वर मस्के, दिलीप कतलेवार, बबलू बिसेन, बोवा भेलावे, मुक्ती फोटो स्टुडिओचा मालक, भैय्यालाल कुरंजेकर, जितू डोंगरे, रमेश सरजारे,राजू मेश्राम, रामू पटले, जोशीराम रहांगडाले, देवा चौधरी सर्व रा. घोटी, डोमा बारेवार रा. गोरेगाव, घनश्याम रमेश माहुरे रा. कमरगाव, दिनेश रामू उईके रा. म्हसगाव व इतर २५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरबळी प्रकरणात तिघांना अटक
सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या आदित्य गौतमला जिवंत करण्याचा दावा करणाºया डॉ. नविन लिल्हारे याने मृतदेह कडक झाला नाही, शरीर पिवळेपडले नाही, भुजा कापल्यावर रक्त येते असे सांगून त्याने त्याला जिवंत करण्याचा दावा केला. त्यामुळे आरोपी डॉ. नविन लिल्हारे,भूनेश लिल्हारे दोन्ही रा. कटंगी व डॉ. इंद्रकुमार बघेले रा. म्हसगाव या तिघांविरूद्ध महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व जादूटोणा लावण्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.