२० हजार ५६७ विद्यार्थी

By Admin | Updated: February 21, 2015 01:37 IST2015-02-21T01:37:35+5:302015-02-21T01:37:35+5:30

जिल्ह्यातच्या आठही तालुक्यातील ६८ केंद्रावरून २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

20 thousand 567 students | २० हजार ५६७ विद्यार्थी

२० हजार ५६७ विद्यार्थी

गोंदिया : जिल्ह्यातच्या आठही तालुक्यातील ६८ केंद्रावरून २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गोंदिया तालुक्यात २१ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी ६२९३, पुनपरीक्षार्थी ५२८ असे एकूण ६७९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. देवरी तालुक्यात ६ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १२५७, पुनपरीक्षार्थी ७४ असे एकूण १३३१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
आमगाव तालुक्यात ५ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १६१४, पुनपरीक्षार्थी ११२ असे एकूण १७२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी २२११, पुनपरीक्षार्थी ६० असे एकूण २२७१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गोरेगाव तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १९३७, पुनपरीक्षार्थी १६१ असे एकूण २११८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १५२५, पुनपरीक्षार्थी १६८ असे एकूण १६९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सालेकसा तालुक्यात ५ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १३६२, पुनपरीक्षार्थी ११५ असे एकूण १४७७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तिरोडा तालुक्यात १० केंद्रावरून नियमीत विद्यार्थी २९८४, पुनपरीक्षार्थी १७६ असे एकूण ३१६० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील ६८ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १९ हजार १७३, पुनपरीक्षार्थी १३९४ असे एकूण २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.सिकलसेलग्रस्तांना तासाला २० मिनिटे अधिक
४सिकलसेल ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी प्रत्येक तासाला २० मिनीटाचा वेळ देण्यात येणार आहे. तीन तासाच्या पेपरला एक तास अधिकचा दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे च्या सचिवांनी दिला आहे.
विद्युतची सोय शाळांकडून
४परीक्षेच्या काळात भारनियमन झाले तर त्या शाळेला जनरेटरची सोय करायची आहे. यासाठी सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. भारनियमन झाल्यास लाईटची सोय करून देण्याची हमी जिल्ह्यातील सर्व केंद्रानी लिहून दिली आहे.
भरारी पथके राहणार
४परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. भरारी पथकात माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथुमक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट, एक महिला पथक व प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या माध्यामातून विविध पथके तयार करून प्रत्येक शाळेत जाणार आहेत.
मागील एक वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॉपी पासून परावृत्त होण्यासाठी मुख्याख्यापक व शिक्षकांनी सहकार्य करावे. कॉपीमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
-शरद खंडागळे
माध्यमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.

Web Title: 20 thousand 567 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.