रेल्वेत २० लाखांची रोख रक्कम पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST2021-04-02T05:00:00+5:302021-04-02T05:00:22+5:30

एका व्यक्तिला संशयाच्या आधारावर सामानासह थांबविण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने आपले नाव राकेश व गोंदियातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या सामानाबाबत चौकशी केल्यावर तो उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १९ लाख ९९ हजार ४०० रुपये रोख प्राप्त झाले. या रकमेबाबत वैध प्रमाणपत्र व लेखा-जोखा विवरण सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने त्याबाबत असमर्थता व्यक्त केली.

20 lakh cash seized from railways | रेल्वेत २० लाखांची रोख रक्कम पकडली

रेल्वेत २० लाखांची रोख रक्कम पकडली

ठळक मुद्देगोंदिया आरपीएफची कारवाई : रेल्वेने जाताना घेतले युवकास ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वेने संशयास्पदरीत्या घेऊन जात असलेली १९ लाख ९९ हजार ४०० रोख रक्कम पोलिसांनी एका युवकाकडून ताब्यात घेतली. रेल्वे क्रमांक ०२८४३ ने नागपूरला जात असताना पोलिसांनी बुधवारी (दि.३१) दुपारी १२.४० वाजता दरम्यान ही कारवाई केली. 
रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानक परिसरात ज्वलनशील पदार्थ व धूम्रपान प्रतिबंधासाठी मंडल सुरक्षा आयुक्त पंकज चूग यांच्या मार्गदर्शनात रेल्वे सुरक्षा दलाकडून  अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान सुरू असताना कर्तव्यावर तैनात असलेल्या मुख्य आरक्षक राजेंद्र रायकवार यांच्याकडून माहितीवरून एका व्यक्तिला संशयाच्या आधारावर सामानासह थांबविण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने आपले नाव राकेश व गोंदियातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या सामानाबाबत चौकशी केल्यावर तो उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १९ लाख ९९ हजार ४०० रुपये रोख प्राप्त झाले. या रकमेबाबत वैध प्रमाणपत्र व लेखा-जोखा विवरण सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने त्याबाबत असमर्थता व्यक्त केली. तसेच रकमेबाबत कोणत्याही प्रकारचे दस्तावेज तो सादर करू शकला नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने त्याचे बयाण घेऊन रुपयांच्या तस्करीचे प्रकरण नोंदविले. तसेच सदर प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी आयकर विभागाकडे सोपविले. ही  कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक नंदबहादूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Web Title: 20 lakh cash seized from railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस