नवेगावबांध येथे २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST2021-04-12T05:00:00+5:302021-04-12T05:00:23+5:30
‘ब्रेक द चेन’अंतर्गत शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजतापासून सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजतापर्यंत येथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना व दुकान कडकडीत बंद आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’ पाळला जात आहे. ‘वीकेंड लॉकडाऊन’ या कालावधीत गावकऱ्यांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

नवेगावबांध येथे २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजतापासून सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजतापर्यंत येथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना व दुकान कडकडीत बंद आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’ पाळला जात आहे.
‘वीकेंड लॉकडाऊन’ या कालावधीत गावकऱ्यांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, येथील सर्व आस्थापना व दुकानी शनिवारी (दि.१०) कडकडीतपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या.
येथील बस स्थानक, आझाद चौक, बालाजी चौक, इंदिरा चौक, टी-पॉइंट चौक हे एरवी वर्दळ असणारे ठिकाण ‘वीकेंड लॉकडाऊन’मुळे निर्मनुष्य झाले आहेत. सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत असून, नियमांचे पालन व्हावे व संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, याकडे नवेगावबांध पोलीस लक्ष ठेवून आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेली आस्थापना व दुकाने मात्र ‘वीकेंड लॉकडाऊन’मधून वगळण्यात आली आहेत.
इतर आस्थापना व दुकान सुरू आढळल्यास, तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नागरिक घराबाहेर आढळल्यास, त्यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम १९८७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे ग्रामपंचायतच्या आदेशात म्हटले आहे.
सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजतापर्यंत घोषित केलेल्या कडकडीत लॉकडाऊनला येथील ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अनिरुद्ध शहारे व ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण यांनी केले आहे. ठाणेदार जनार्दन हेगडकर व त्यांचे सहकारी गावात गस्त करीत असून, परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहेत.