ढाकणी व लोधीटोलातून १.७९ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:26 IST2021-02-20T05:26:22+5:302021-02-20T05:26:22+5:30
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम ढाकणी व लोधीटोला येथे प्रत्येकी एक अशा दोन चोऱ्या सारख्याच पद्धतीने करण्यात आल्या ...

ढाकणी व लोधीटोलातून १.७९ लाखांचा ऐवज लंपास
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम ढाकणी व लोधीटोला येथे प्रत्येकी एक अशा दोन चोऱ्या सारख्याच पद्धतीने करण्यात आल्या आहेत. घराचे मागील दार फोडून या दोन्ही चोऱ्या करण्यात आल्या आहेत.
याअंतर्गत ग्राम ढाकणी येथील देवानंद गंगाधर लिल्हारे (३६) यांच्या घरातून १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ९८ हजार रुपये रोख, १५ ग्रॅम वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १० ग्रॅम वजनाची २० हजार रुपयांची सोन्याची नथ, एक हजार रुपये किमतीची चांदीची पायपट्टी, आठ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या २ बिऱ्या, ४ ग्रॅम वजनाची आठ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे पायातील २ जोड, चार हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या बिऱ्या असा एकूण एक लाख ७० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला.
तर लोधीटोला-चुटीया येथील धनसिंग सुरजलाल अटरे यांच्या घरातून चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे १० मणी व पाच हजार रुपये रोख असा एकूण नऊ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. या दोन्ही घटनांसंदर्भात शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे करीत आहेत.