दरेकसात मलेरियाचे १७७ रूग्ण

By Admin | Updated: September 4, 2014 23:53 IST2014-09-04T23:53:01+5:302014-09-04T23:53:01+5:30

सालेकसा तालुक्याच्या दरेकसा परिसरातील आठ गावे हिवतापाच्या सावटात आहेत. या गावांची अती जोखमेची गावे म्हणून निवड करण्यात आली आहे. दरेकसा येथे १४ रूग्ण, मुरकुटडोह १९, दंडारी १५,

177 patients of malaria in the world | दरेकसात मलेरियाचे १७७ रूग्ण

दरेकसात मलेरियाचे १७७ रूग्ण

आठ महिन्यांत आढळले : दिल्लीची चमू दाखल
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या दरेकसा परिसरातील आठ गावे हिवतापाच्या सावटात आहेत. या गावांची अती जोखमेची गावे म्हणून निवड करण्यात आली आहे. दरेकसा येथे १४ रूग्ण, मुरकुटडोह १९, दंडारी १५, जमाकुडो २३, धनेगाव १२, दलदलकुही ११, पिपरीया १६ तर नवाटोला या गावात १५ रूग्ण सद्य स्थितीत आहेत. तर जानेवारी ते ३० आॅगस्ट या काळात एकूण ७२७१ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले असून यात १७७ रुग्ण मलेरियाने ग्रसीत असल्याचे अहवालातून पुढे आले आहे.
केंद्र शासनाच्या क्षेत्रीय जनजाती आयुर्विज्ञान अनुसंधान केंद्र, स्वास्थ अनुसंधान विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी हिवतापाची त्वरीत तपासणी, त्यांची गुणवत्ता पडताळणी करण्याकरिता भारतात आठ राज्यांची निवड केली आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, ओरीसा व राजस्थान या आठ राज्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अतीदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे हिवतापाचे रुग्ण सर्वात जास्त निघत आहेत. त्यांची कारणमिमांसा व शिघ्र तपासणी कीट यांची गुणवत्ता, पडताळणी करण्याकरिता ‘सी’ रिजनल मेडीकल रिर्सच सेंटर फॉर ट्रायबल इंडियन कौंसील आॅफ मेडीकल रिसर्च, जबलपूरचे (म.प्र.)े शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण के. भारती, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयागशील डोगरा, डाटा मॅनेजर एम.पी. सिंग ही तीन सदस्यीय चमू बुधवारी (दि.२ ) जिल्ह्यात दाखल झाली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक चिमणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. आर.पी. हेडाऊ हे या परिसरात तपासणी व निरीक्षण करीत आहेत. दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चमूतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ डोगरा हे दोन महिने दरेकसा येथे वास्तव्यास राहणार आहेत. त्यांनी हिवतापाचे १०० दुषीत रक्त नमुने तपासणी करण्याकरिता जबलपुर येथील प्रयोगशाळेत पाठविणार आहेत.
जानेवारी ते ३० आॅगस्ट दरम्यान एकूण सात हजार २७१ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले आहेत. यात १७७ नमुने दुषीत आढळून आले आहेत. यामध्ये टीवी ७७ व पीएफ १०० चे रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात हिवताप रुग्णांचे प्रमाण सर्वात जास्त दरेकसा येथे आहे. प्रा. आ. केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी दुषीत निघालेल्या हिवतापाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष दिले आहे. त्या रूग्णांचा समूळ उपचार करून १७७ रुग्णांचे प्राण वाचविल्याबद्दल भारत सरकारच्या चमूने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनंतवार, डॉ. चिमणे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या चमूसोबत जिल्हा हिवताप कार्यालयाचे कर्मचारी नरेंद्र गुप्ता, पर्यवेक्षक दिपक कुंभरे, एल.जी. निपाने, ए.बी. सीरपुरवार, संजय गुप्ता, पी.एफ . कटरे, योगीता वावरे, आर.एन. प्रसाद, अनीता गोडसेलवार, एम.डी. रंगारी, एच.आर. भरणे, एल.डी. भुसारे, आर.डी. समरीत, आर.डब्ल्यू. दोनोडे, व्ही.एल. राधोर्ते, सेलोकर, एस.डी. उके. पी.पी. पटले, ए.डी. पटले. बी.पी. मेश्राम, फुंडे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील मनोज वाहने, एम.बी.तिवारी, ए.एस. रहमतकर, एस.के. दोनोडे, चौरागडे, कमल गंगभोज आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 177 patients of malaria in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.