१० लाखांच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 20:08 IST2022-02-23T20:07:17+5:302022-02-23T20:08:49+5:30

Gondia News दहा लाखाच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतशिवारात बुधवारी (दि.२३) दुपारी ३ वाजता उघडकीस आली.

17-year-old boy murdered for Rs 10 lakh ransom | १० लाखांच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा खून

१० लाखांच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा खून

ठळक मुद्देमावशीच्या गावाला गेलेला चेतन परतलाच नाहीगळा आवळून केला खून

गोंदिया: दहा लाखाच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतशिवारात बुधवारी (दि.२३) दुपारी ३ वाजता उघडकीस आली. चेतन नरेश खोब्रागडे (१७) रा. बनगाव ता. आमगाव असे मृत बालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चेतन खोब्रागडे हा मावशीच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी येथे निघाला. परंतु रात्री घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोधाशोध करुन विचारपूस केली. मात्र त्याचा शोध लागला नाही. मुलगा घरी न परतल्यामुळे वडीलाने रात्री आमगाव पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली.

दरम्यान रात्रीच चेतनचे अपहरण केले. त्यासाठी १० लाख रूपयाची खंडणी द्या अशी मागणी केली होती. खंडणीसाठी जो फोन आला तो फोन क्रमांक कुणाचा आहे तपासल्यावर तो फोन दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (२४) रा. नवेगाव खैरलांजी (मध्यप्रदेश) याच्या असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करीत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. बोदा येथील शेतात असलेल्या तणसीच्या ढिगाऱ्यात मृतदेह ठेवला होता. त्याची चप्पल तणसाच्या ढिगाऱ्याच्या बाहेर मिळाली. त्या चप्पलजवळ जाऊन श्वान थांबला. पोलिसांनी तणसीच्या ढिगाऱ्यात शोध घेतला असता चेतनचा मृतदेह आढळला. चेतन हा आयटीआयमध्ये शिकत होता. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.

Web Title: 17-year-old boy murdered for Rs 10 lakh ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.