अल्पसंख्याक क्षेत्रासाठी १.६५ कोटी
By Admin | Updated: May 8, 2016 01:44 IST2016-05-08T01:44:48+5:302016-05-08T01:44:48+5:30
जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधांकरिता मोठा निधी उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने

अल्पसंख्याक क्षेत्रासाठी १.६५ कोटी
पालकमंत्र्यांचा पुढाकार : जिल्ह्यातील आमदारांच्या पाठपुराव्याला यश
गोंदिया : जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधांकरिता मोठा निधी उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने एक कोटी ६४ लाख ९२ हजार रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम यांनी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
यात, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता पाच लाख रुपये, राजोली येथे कब्रस्तान आवारभिंत करिता सहा लाख, वारव्ही येथील दर्ग्याजवळ सभामंडप व विंधन विहीर बांधकामासाठी सहा लाख, सिरोली येथे कब्रस्थान आवारभिंतसाठी सात लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.
आमगाव येथील तुकडोजी चौकात मुस्लीम समाजाच्या जागेवर सभामंडप बांधकामासाठी पाच लाख, बनगाव येथे सलीम शेख ते शकील शेख यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकामासाठी दोन लाख ९९ हजार रूपये मंजूर झाले आहे.
देवरी तालुक्यातील ककोडी येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता पाच लाख, चिचगड येथे मशिद सभागृहाकरिता पाच लाख, ख्वाजाभाई यांच्या घरासमोरील रस्ता सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार, ख्वाजाभाई यांच्या घरासमोरील रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार, देवरी येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता पाच लाख, पुराडा येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता १० लाख मंजूर केले आहेत.
सडक-अर्जुनी तालुक्यातील कब्रस्थानजवळ विंधन विहिरी बांधकामासाठी एक लाख, पांढरी येथे आवारभिंत व विंधन विहिरीकरिता सहा लाख, राका येथे आवारभिंत व विंधन विहिरीकरिता पाच लाख, सावंगी येथे दर्गा इमारत बांधकामासाठी पाच लाख, सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द येथे जुमनशाह ते खोटोलाशाह यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरणासाठी दोन लाख, साकरीटोला येथे कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी १० लाख व सालेकसा येथे कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी १० लाख असा एकूण ९९.९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे कब्रस्थानपर्यंत रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी पाच लाख व आवारभिंत बांधकामासाठी पाच लाख, आवारभिंत बांधकामासाठी पाच लाख मंजूर करण्यात आले आहे.
गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे मुस्लीम वस्तीमध्ये शादीखाना हॉल बांधकामासाठी १० लाख, तिरोडा तालुक्यातील बोरा येथे कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी १० लाख, गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे दरगाहच्या सार्वजनिक सभागृहाकरिता १० लाख मंजूर करण्यात आला आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे दरगाह बांधकामासाठी पाच लाख, कब्रस्तान रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी दोन लाख व या रस्त्याच्या सीडी वर्ककरिता तीन लाख असा ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमगाव येथे अब्दुल रज्जाक भुरा यांच्या घरामागील मजारमध्ये आवारभिंत बांधकामासाठी दोन लाख ९९ हजार, साखरीटोला येथे मतीन कुरैशी ते अली सय्यद यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार, मस्जीदमध्ये सभामंडप बांधकामाकरिता दोन लाख ९९ हजार, कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी दोन लाख ९९ हजार व सलीम खान यांच्या घरासमोरील रस्ता सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार असा एकूण १४.९५ लाख रुपयांचा निधी मंज़ूर करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)