१६ विद्यार्थ्यांचा आज सुवर्णपदकाने गौरव
By Admin | Updated: February 8, 2015 23:34 IST2015-02-08T23:34:19+5:302015-02-08T23:34:19+5:30
शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त गोंदियात सोमवारी (दि.९) होत असलेल्या शानदार सोहळ्यात ज्येष्ठ क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते १६ विद्यार्थ्यांना

१६ विद्यार्थ्यांचा आज सुवर्णपदकाने गौरव
मनोहरभाई जयंती : सचिन तेंडुलकर, हिराणींची उपस्थिती
गोंदिया : शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त गोंदियात सोमवारी (दि.९) होत असलेल्या शानदार सोहळ्यात ज्येष्ठ क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते १६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात येणार आहे.
येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता हा सोहळा होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष व मॅककेन वर्ल्डग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसुन जोशी, आ.गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंभारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. दिलीप बंसोड, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. अनिल बावणकर, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ. मधूकर कुकडे, मनोहरभाई पटेल अकादमीचे अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित राहतील.
सुवर्णपदक वितरण समारंभाची तयारी आ.राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शालांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन गौरविले जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)