१६ विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक

By Admin | Updated: February 4, 2015 23:18 IST2015-02-04T23:18:21+5:302015-02-04T23:18:21+5:30

स्व. मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शाळांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देण्यात

16 students get gold medal | १६ विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक

१६ विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक

गोंदिया : स्व. मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शाळांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देण्यात येणार आहेत. सदर समारंभ सोमवारी (दि.९) दुपारी १२ वाजता मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय (एमआयईटी) कुडवा येथे होणार आहे.
सुवर्णपदक वितरण समारंभाचे उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटर भारतरत्न खा. सचिन तेंदुलकर यांच्या हस्ते ना. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अतिथी म्हणून चित्रपट निर्देशक राजकुमार हिरानी, एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष व मॅककेन वर्ल्डग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसुन जोशी, आ. गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंभारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. दिलीप बंसोड, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. अनिल बावणकर, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ. मधूकर कुकडे, मनोहरभाई पटेल अकादमीचे अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित राहतील.
सुवर्णपदक वितरण समारंभाची तयारी आ. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १६ विद्यार्थ्यांची निवड सुवर्णपदकांसाठी करण्यात आली आहे.
यात गुजराती नॅशनल हायस्कूलमधून एसएससी परीक्षेतील प्रथम नेहा झनेश पशिने, पवन रूमेश्वर रहांगडाले, गोंदिया जिल्ह्यातून एसएससी परीक्षेत प्रथम आलेला आकाश नितीन कोतवाल, दीपिका दामोधर वाघमारे, शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीतील प्रथम मुस्कान महेश अग्रवाल, गोंदिया जिल्ह्यातून बारावीतील प्रथम प्रशांत चैतराम पारधी, गोंदिया जिल्ह्यातून बीए प्रथम श्रेणीत रेणू अशोककुमार अग्रवाल, बीकॉम प्रथम श्रेणी पिंकी महेशकुमार सचदेव, बीएससी प्रथम श्रेणी विदेश राजकुमार रामटेके, बीई प्रथम श्रेणी रौनक विजयकुमार वेगड, भंडारा जिल्ह्यातून दहावीत प्रथम क्षितिजा नरेंद्र राजाभोज, बारावीत प्रथम पूनम भोजराज शहारे, बीए श्रेणीत प्रथम चेतना जवाहर तर्जुले, बीकॉम श्रेणीत प्रथम मंगेश चरणदास कोचे, बीएससी श्रेणीत प्रथम तृप्ती नूरदेव चौधरी व बीई श्रेणीत प्रथम चेतन प्रमोद अग्रवाल यांचा समावेश आहे.
सुवर्ण पदक वितरण समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल स्मृती समितीचे अध्यक्ष हरिहरभाई पटेल व मनोहरभाई पटेल अकादमीचे सचिव आ. राजेंद्र जैन यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 16 students get gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.