गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठीचे १५२३ बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST2020-10-20T06:00:00+5:302020-10-20T06:00:25+5:30

corona Gondia News महिनाभरापूर्वी बेडसाठी दाणादाण होत असताना आता मात्र बेड रिकामे होत असल्याने आता कोरोनाची दहशत संपत असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

1523 empty beds for corona patients in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठीचे १५२३ बेड रिकामे

गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठीचे १५२३ बेड रिकामे

ठळक मुद्देजिल्ह्यात १८४६ बेडची सोय३२३ रूग्ण घेताहेत उपचार


नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या दहशतीत मागील ६ महिन्यांपासून असलेला गोंदिया जिल्हा आता सावरू लागला आहे. महिनाभरापूर्वी बेडसाठी दाणादाण होत असताना आता मात्र बेड रिकामे होत असल्याने आता कोरोनाची दहशत संपत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. रविवारपर्यंत गोंदिया जिल्ह्यात कोरोना रूग्णांसाठी १८४६ बेडची सोय करण्यात आली आहे. यात ३२३ रूग्णांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर १५२३ बेड रिकामे आहेत.

आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यात ६६६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ८७४५ जण कोरोना बाधीत आढळले आहेत. यातील ९७३ कोरोना रूग्ण क्रियाशील आहेत. तर ७६६१ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाने गोंदिया जिल्ह्यात आतापर्पयंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ह्यमाझे कुटुंब-माझी जबाबदारीह्ण या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा तत्पर असल्याचे दिसत आहे.

खासगी कोविड सेंटरचा दररोजचा खर्च?
खासगी रूग्णालयात असलेल्या एका रूग्णामागे सहा-सात हजार रुपए खर्च होतो. कमी बेडचे कोविड सेंटर चालविणे खासगी डॉक्टरांनाही परवडत नसल्याची ओरड खासगी कोविड सेंटर चालविणा?्यांची आहे.
एकीकडे खासगी कोवीड सेंटरमध्ये आता रुग्ण कमी जात असल्याने सेंटर चालविणे परवडत नसल्याची कुणकुण खासगी डॉक्टरांकडून सुरू झाली आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना समाधान होत आहे.
आता कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने बेड सहजरित्या रूग्णांना उपलब्ध होत आहेत. कोरोनाची असलेली दहशत संपत आहे. आता गरजूंना उपचार मिळावा यासाठी नागरिक समजदारीने वागत आहेत. कोरोना झाला की बेडच हवा आहे ही चुकीची गोष्ट नागरिकांच्या लक्षात आली आणि गरजूंसाठी बेड रिकामे होऊ लागले.

कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने आता सहजरित्या रूग्णांना बेड उपलब्ध होत आहेत. गरजूंनाच बेड मिळावे यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे व लोकांनी घेतलेल्या काळजीमुळे बेड उपलब्ध आहेत.
-डॉ. अरविंद खोब्रागडे

Web Title: 1523 empty beds for corona patients in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.