शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

पूर्व विदर्भातील दीड लाख शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:29 IST

अंकुश गुंडावार । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर हमीभावाने ...

ठळक मुद्देशासनाच्या भूमिकेकडे लक्ष : विलंब होत असल्याने शंका, शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर पायपीट

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे दरवर्षी बोनस जाहीर केला जातो. याची शेतकºयांना थोडीफार मदत होत असते. मात्र यंदा धान खरेदीला सुरूवात होवून चार महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही शासनाने बोनस जाहीर न केल्याने पूर्व विदर्भातील दीड लाखावर शेतकरी प्रतीक्षेत आहे.पूर्व विदर्भात ६ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धान हेच या भागातील मुख्य पीक असल्याने याच पिकावर या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दिवसेंदिवस धानाच्या प्रती एकरी लागवड खर्चात वाढ होत आहे. मात्र त्यातुलनेत धानाला हमीभाव मिळत नसल्याने धानाची शेती तोट्याचा सौदा होत आहे. केंद्र सरकारने मागील पाच वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ २५० रुपयांनी वाढ केली आहे. तर त्यातुलनेत धानाच्या लागवड खर्चात पाच ते सातपट वाढ झाली आहे.यंदा शासनाने अ दर्जाच्या धानाला १७५० व सर्वसाधारण धानाला १७७० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर लगतच्या छत्तीसगडमध्ये धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव मिळत आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या हमीभावात प्रती क्विंटल ८०० रुपयांचा फरक आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकºयांमध्ये यावरुन रोष व्याप्त आहे. पूर्व विदर्भात यंदा २५० हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून आत्तापर्यंत ३० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आली आहे.धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दीड लाखावर असून हे सर्व शेतकरी शासनाकडून बोनस जाहीर होईल या प्रतीक्षेत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत शासनाकडून धानाला प्रती क्विंटल बोनस जाहीर केला जातो. मात्र यंदा खरेदीला सुरूवात होवून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी बोनसची घोषणा न झाल्याने धान उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत.आचार संहितेपूर्वी घोषणेची शक्यताएप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. शासनाकडून निवडणुकीच्या तोंडावर आचार संहिता लागण्यापूर्वी धानावर बोनस जाहीर करुन याचा निवडणुकीत लाभ करुन घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बोनसची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.बोनस किती?शासनाने मागील वर्षी धानाला प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस जाहीर केला होता. तर यंदा छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार येताच धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये यावरुन रोष निर्माण झाला आहे. निवडणुका तोंडावर असल्याने शेतकऱ्यांचा हा रोष सरकारला परवडणार नाही. त्यामुळे यंदा धानाला ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत बोनस जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी