जिल्ह्यात मिळाले फायलेरियाचे १४ नवीन रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:40 IST2019-02-22T23:38:57+5:302019-02-22T23:40:29+5:30
नागपूर येथील हत्तीरोग सर्वक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात १४ नवीन रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात ७ ते १६ जानेवारी या कालावधीत ८ ठिकाणांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणांतर्गत शहरी व ग्रामीण भागांचा समावेश असून रात्रीला हे सर्वेक्षण करण्यात आले.

जिल्ह्यात मिळाले फायलेरियाचे १४ नवीन रूग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर येथील हत्तीरोग सर्वक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात १४ नवीन रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात ७ ते १६ जानेवारी या कालावधीत ८ ठिकाणांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणांतर्गत शहरी व ग्रामीण भागांचा समावेश असून रात्रीला हे सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणांतर्गत, शहरातील वाजपेयी वॉर्डात ५०७ जणांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणीत हत्तीरोगाचे २ रूग्ण आढळून आले. भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोधीटोला येथे ५०३ जणांच्या रक्ताचे नमूने घेतले असता त्यात २ जणांना हत्तीरोग असल्याचे स्पष्ट झाले. एकोडी आरोग्य केंद्रांतर्गत खर्रा येथे १९३, केऊटोला येथे ५७ व ओझीटोला येथे ३१० जणांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. यात खर्रा व ओझीटोला येथे प्रत्येक एक रूग्ण मिळून आला. रावणवाडी आरोग्य केंद्रांतर्गत कटंगीटोला येथे २४४ तर चांदनीटोला येथे ३१३ जणांच्या रक्ताचे नमूने घेतले असता त्यात चांदनीटोला येथील एका व्यक्तीला फायलेरिया असल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय शहरी भागात तिरोडा येथील ने६गरू वॉर्डात यंदा रात्रीला तपासणी करण्यात आली. या वॉर्डातील ५०३ जणांच्या रक्ताचे नमूने घेतले असता त्यात २ रूग्ण मिळून आले. तिगाव आरोग्य केंद्रातील कोकीटोला व सोनखारी येथे ५७१ जणांच्या रक्ताचे नमूने घेतले असता त्यात एकही रूग्ण मिळाला नाही. डव्वा आरोग्य केंद्रांतर्गत खजरी येथे ५१४ जणांचे नमून घेतले असता त्यात एक रूग्ण मिळून आला. तर गोठणगाव आरोग्य केंद्रातंर्गत कुंभीटोला येथे ५९८ जणांच्या रक्ताचे नमूने घेतले असता या गावात ४ रूग्ण मिळून आले.
१५ वर्षांत मिळाले ५८६ रूग्ण
रात्री १० वाजतापर्यंत केल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणात मागील १५ वर्षांत फायलेरियाचे ५८६ रूग्ण मिळून आले आहेत. यात फिक्स गावांत ३४२ रूग्ण असून रँडम गावांत २४४ रूग्ण मिळाले आहेत. वर्षनिहाय बघितल्यास, सन २००४ मध्ये ४०, सन २००५ मध्ये ६८, सन २००६ मध्ये ४३, सन २००७ मध्ये ५४, सन २००८ मध्ये १३, सन २००९ मध्ये ३७, सन २०१० मध्ये ३४, सन २०११ मध्ये ६८, सन २०१२ मध्ये ५७, सन २०१३ मध्ये ३८, सन २०१४ मध्ये ४४, सन २०१५ मध्ये २३, सन २०१६ मध्ये ३४, सन २०१७ मध्ये १९ तर सन २०१८ मध्ये १४ जणांना फायलेरिया असल्याची पुष्टी नागपूरच्या फायलेरिया सर्व्हे युनिटने केली आहे. यावरून जिल्ह्यात फायलेरियाचा प्रकोप आहेच हे दिसून येते.
४ पथकांनी केले सर्वेक्षण
नागपूर येथून या सर्वेक्षणासाठी ४ पथक आले होते. येथील मलेरिया विभागातील कर्मचाºयांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण १६ हजार ३५८ लोकसंख्येत हे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी ४ हजार ३१३ जणांच्या रक्ताचे नमूने रात्रीला घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. हे सर्वेक्षण दोन प्रकारे केले जाते. यात (फिक्स) ठरावीक गावांसाठी मोहिम राबविली जात असून दरवर्षी तेथे सर्वेक्षण केले जाते. तर (रँडम साईट) काही गावे बदलली जात असून दरवेळी नवे गाव किंवा वाड्यांमध्ये सर्वेक्षण केले जाते.