१४१ पैकी १३९ स्वॅब नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:14+5:30
जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. तर कोरोबाधीत जिल्हा अथवा राज्यातील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करु नये यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहे.

१४१ पैकी १३९ स्वॅब नमुने निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण १४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३९ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीत महाविद्यालयाला मंगळवारपर्यंत (दि.२१) प्राप्त झाला आहे. सर्व १३९ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आढळले असून केवळ दोन नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. तर कोरोबाधीत जिल्हा अथवा राज्यातील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करु नये यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. परवानगी पासेस असलेल्या व्यक्तींनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. तर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिल्यास त्यांना आरोग्य विभागातर्फे शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. त्यामुळेच मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या आवश्यक उपाययोजनामुळे जिल्हा कोरोनामुक्त आहे.
जिल्ह्यातील तीन शासकीय क्वारंटाईन कक्षात सध्या १८ जण उपचार घेत आहेत.यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज १०, सडक अर्जुनी १ आणि चांदोरी ७ अशा एकूण १८ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव दोडके यांनी दिली.
जिल्हा बंदीमुळे अडकले अधिकारी व कर्मचारी
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर कोरोनाबाधीत जिल्ह्यातील नागरिकांचा जिल्ह्यात प्रवेश होवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहे. पवानगी पासेस शिवाय कुणालाही प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून अपडाऊन करणाºया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
यादी करण्याचे निर्देश
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सध्या आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा व्यस्त आहे. तसेच सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या आहे. मात्र यानंतरही काही अधिकारी आणि कर्मचारी अपडाऊन करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बाहेरुन अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश देऊ नये अश्या सूचना दिल्याची माहिती आहे. तसेच अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयारी करण्याचे निर्देश दिले आहे.