अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या.. सारेच चक्रावले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 18:55 IST2020-07-23T18:54:46+5:302020-07-23T18:55:07+5:30
अर्जुनी-मोर तालुक्यातील एरंडी देवी येथील एका १३ वर्षीय मुलीने गुरुवारी दुपारी तीन वाजता घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या.. सारेच चक्रावले..
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: अर्जुनी-मोर तालुक्यातील एरंडी देवी येथील एका १३ वर्षीय मुलीने गुरुवारी दुपारी तीन वाजता आपले राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्या परिवारात आई व दोन बहिण भाऊ आहेत. आई आणि मोठी बहिण शेतकामासाठी बाहेर होती. मोठा भाऊ बाहेरगावी गेला होता. तो घरी परतल्यावर ती गळफास घेतलेली दिसून आली.
या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोदले घटनास्थळी दाखल झाले. तिने बालवयात गळफास का घेतला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतदेह तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.