ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहूसाठी १० हजार प्रतिहेक्टरी कर्ज

By Admin | Updated: May 11, 2014 00:27 IST2014-05-11T00:27:57+5:302014-05-11T00:27:57+5:30

खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते.

13 thousand for olita farming and 10 thousand for every dry land | ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहूसाठी १० हजार प्रतिहेक्टरी कर्ज

ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहूसाठी १० हजार प्रतिहेक्टरी कर्ज

रावणवाडी : खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते. परंतु सध्याच्या धोरणात बँकांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्ज देण्याऐवजी ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहू प्रतिहेक्टरी १० हजार रूपये कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने नवीनच संकट शेतकर्‍यांवर ओढवले आहे. सन २०१३ ते १४ या वर्षात नवीन धोरणाचा उपयोग करण्यात येत असल्याने शेतकरी आल्यापावली बँकेच्या दारातून परतला आहे. पूर्वीचे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसामुळे धानाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. मृगाचा हंगाम केवळ महिनाभर येऊन ठेपला आहे. बँकांची मदत घेऊन नव्या दमाने धान उत्पादन करू, असा आशावाद त्यांना होता. परंतु या धोरणाने त्यांच्या आशेवरच पूर्णत: पाणी फेरले. परिसरात काही शेतकर्‍यांनी जमीन कसण्याची उगीचच कटकट म्हणून जमिनी कवडीमोल भावात विकण्याचा सपाटा सुरू केला. काही दलालांच्या टोळ्या गावागावांत शेतकर्‍यांच्या दारात पोहचत असल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांचा कल हक्काचा व नगदी रोजगाराकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे बँकेने सरसकट कर्ज देवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बँकेचे कर्ज, सावकाराची मदत आणि सरकारचे धोरण शेतकर्‍यांपर्यंत वेळेवर पोहचले नसल्याने मागील वर्षी जिल्ह्यातील एकूण पेरणीयुक्त जमिनीपैकी २४ हजार २९० हेक्टर जमीन पडीत राहिली. शेतकर्‍यांनी शेती करण्यासाठी कायमचा रामराम ठोकला. काहींनी शहरात धाव घेऊन मिळेल तो व्यवसाय स्वीकारला. भूमाफियांना मात्र या संधीचे सोने केले. (वार्ताहर)

Web Title: 13 thousand for olita farming and 10 thousand for every dry land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.