११ मजुरांचा जबलपूर येथे मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2017 03:03 IST2017-05-12T03:03:40+5:302017-05-12T03:03:40+5:30
तेंदुपत्ता तोडण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे गेलेल्या मजुरांच्या पीकअप व्हॅनला गुरुवारी पहाटे अपघात

११ मजुरांचा जबलपूर येथे मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तेंदुपत्ता तोडण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे गेलेल्या मजुरांच्या पीकअप व्हॅनला गुरुवारी पहाटे अपघात झाला. यात ११ मजूर ठार तर १५ गंभीर जखमी झाले.
तेंदुपत्ता कंत्राटदाराने मजुरांना जंगलात नेण्यासाठी वनविभागाची पीकअप व्हॅन नेली होते. जमुनिया येथे पुलाच्या उतारावर मद्यधुंद चालकाने व्हॅनचे इंजीन बंद केले. यामुळे स्टेअरिंग लॉक झाले आणि व्हॅन पूलावरून २५ फूट खोल नाल्यात कोसळली.