शहरं
Join us  
Trending Stories
1
'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
2
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
3
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
4
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
5
“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
6
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
7
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
8
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
9
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...
10
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
11
Mandira Bedi : "ते माझं घर चालवायला येणार नाहीत, दुःख आहे जे...."; पतीच्या निधनावर पहिल्यांदा बोलली मंदिरा
12
तो लॅपटॉप सोबतच ठेवतो अन् मॅच संपल्यावर ऑफिस काम करतो! सौरभ नेत्रावळकरची कमिटमेंट
13
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
14
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
15
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
16
Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'
17
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
18
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
19
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
20
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'

१०८ पोलिसांना खडतर सेवेचे पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:23 AM

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशिल असल्यामुळे या जिल्ह्यात काम करण्यासाठी पोलीस अधिकारी होत नाही. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे७ डिसेंबर रोजी वितरण : पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशिल असल्यामुळे या जिल्ह्यात काम करण्यासाठी पोलीस अधिकारी होत नाही. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देण्यात येत आहे. ७ डिसेंबरला पोलीस मुख्यालय कारंजा येथील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सदर पदक देवून पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी शुक्रवारी (दि.३०) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गोंदिया जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या कामाची पावती मिळावी म्हणून गोंदिया पोलीस विभागाने दोन वर्षापूर्वी पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी त्यांची माहिती व प्रस्ताव मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविला होता. शासनाने गोंदिया जिल्ह्यात कार्य करणाऱ्या ३१ अधिकारी व ७७ पोलीस कर्मचारी यांना खडतर सेवेचा पुरस्कार देण्यात येत आहे. यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५७ पोलीस कर्मचारी गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहेत.तर ५० अधिकारी कर्मचारी बदलून गेले आहेत. बदली झाल्यानंतर ज्या ठिकाणी ते अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी पोलीस परेडमध्ये सदर पदक दिले जाणार आहे. या पदकासाठी गोंदिया जिल्ह्यात सेवा दिलेले सात पोलीस निरीक्षक, ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक, ७७ कर्मचारी असे १०८ लोकांची निवड करण्यात आली.राज्यात गोंदिया व गडचिरोली सोडू काम करणाºया पोलीस अधिकाºयांना या दोन जिल्ह्यात काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणृून शासनाने खडतर सेवेचे पदक देण्याचे ठरविले आहे.जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पदककठिण व खडतर कामगीरी केल्याबद्दल विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले. त्यात गोंदिया जिल्ह्यात सद्या कार्यरत असलेले डुग्गीपार पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, दिलीप हातझाडे, अशोक टिचकुले, शितल भांडारकर, आशा बोरकर, सुषमा कनपुरीया, काजल पंच, पुरूषोत्तम देशमुख, राजेंद्र चकोले, दिलीप बंजार, प्रशांत कुरंजेकर, प्रकाश मेश्राम, अर्जुन सांगळे, मनोज केवट, गंगाधर केंद्र, श्रीकांत नागपुरे, राकेश भुरे, रूपेंद्र गौतम, शिवलाल उईके, प्रसन्या सुखदेवे, नितेश गवई, देवेंद्र कोरे, चंद्रमणी खोब्रागडे, सुरेश बावणकर, अनिल उके, बिंदीया कोटांगले, गौतम भैसारे, संतोष चुटे, पुरूषोत्तम बोपचे, कैलाश यादव, ममता दसरे, प्रतापसिंह सलामे, किशोर टेंभूर्णे, लक्ष्मण गोटे, चुळीराम शेंडे , शालीकराम दखने, बाबुलाल राऊत, सुरेश कटरे , ओमप्रकाश जामनिक, यादोराव कुर्वे, सुनील गुट्टे, हंसराज अरकासे, अमित लांडगे, रामेश्वर राऊत, आशिष वंजारी, ईश्वरदास जनबंधू, मनोज चुटे , विलास नेरकर, हितेश बरिये, संदीप झिले, लियोनार्ड मार्र्टींन, महेंद्र मेश्राम, घनश्याम उईके, सेवक राऊत,राजेंद्र बिसेन, नितीन रहांगडाले , योगेश गावंडे ,अमित नागदेवे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस