शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

१०६२ शाळा पूर्ण वेळ सुरू करण्यास सहमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

कोरोनाचा उद्रेक काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नसतानाच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये हा विचार करून शासनाकडून शाळा सुरू करण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यातच २६ जून रोजीच शाळेचा ठोका वाजवायचा की नाही याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते.

ठळक मुद्देशाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय : प्राथमिक शिक्षण विभागाने केले नियोजन

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शाळी कधी सुरू करायच्या विषयाला घेऊन अद्यापही संभ्रमावस्था असतानाच शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समित्यांना घेण्याचा अधिकार शिक्षण विभागाने दिला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील १०६२ प्राथमिक शाळा २६ जूनपासून सुरू करण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांनी होकार दिला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक २५८ शाळा व्यवस्थापन समित्यांनी ‘हिरवी झेंडी’ दिली आहे.कोरोनाचा उद्रेक काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नसतानाच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये हा विचार करून शासनाकडून शाळा सुरू करण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यातच २६ जून रोजीच शाळेचा ठोका वाजवायचा की नाही याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील १६५४ शाळांच्या व्यवस्थापन समित्यांना सभा घेऊन तसा निर्णय घेण्यास सांगीतले होते. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्वच शाळा व्यवस्थापन समित्यांनी या विषयावर निर्णय घेतला व शिक्षण विभागाला पाठविला. त्यानुसार, जिल्ह्यातील १०६२ शाळा पूर्णवेळ सुरू करण्यास समित्यांनी होकार देत ‘हिरवी झेंडी’ दिली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक २५८ शाळांचा समावेश असून सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात कमी ५२ शाळांनी सहमती दर्शविल्याचे दिसत आहे. याशिवाय, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १२९, आमगाव तालुक्यातील १०३, देवरी तालुक्यातील १६७, गोरेगाव तालुक्यातील १००, सालेकसा तालुक्यातील १२७ तर तिरोडा तालुक्यातील १२६ शाळांचा समावेश आहे.नियमित अर्ध वेळेसाठी ३८२ शाळानियमित पूर्णवेळ शाळा सुरू करण्यासाठी सर्वाधिक १०६२ शाळा व्यवस्थापन समित्यांनी होकार दर्शविला असतानाच त्यानंतर ३८२ समित्यांनी नियमित अर्ध वेळ शाळा सुरू करण्यासाठी सहमती दर्शविली.यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६७, आमगाव ४४, देवरी २१, गोंदिया १३६, सालेकसा १७, सडक-अर्जुनी ४६ तर तिरोडा तालुक्यातील ५१ शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव तालुक्यात १५७ समित्यांपैकी नियमित पूर्णवेळ शाळा सुरू करण्यासाठी १०० तसेच काही विद्यार्थी ऑनलाईन-काही विद्यार्थी शाळेत राहून शाळा सुरू करण्यास उर्वरीत ५७ समित्यांनी सहमती दर्शविली. येथे तालुक्यातील समित्यांनी नियमित अर्ध वेळ व एक दिवस आड शाळा सुरू करण्याचा पर्याय नापसंत केल्याचे दिसत आहे. याशिवाय ७९ समित्यांनी एक दिवस आड तर १३१ समित्यांनी काही विद्यार्थी ऑनलाईन-काही विद्यार्थी शाळेत राहण्याचा पर्याय निवडला आहे.

टॅग्स :Schoolशाळा