दोन दिवसांत १०६ बसफेऱ्या रद्द
By Admin | Updated: August 6, 2014 23:53 IST2014-08-06T23:53:49+5:302014-08-06T23:53:49+5:30
मंगळवारी (दि.५) आलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळील झाले होते. नदी-नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणची वाहतून ठप्प पडली. त्यामुळे ५ व ६ आॅगस्ट या दोन दिवसांत

दोन दिवसांत १०६ बसफेऱ्या रद्द
रजेगाव पूल सुरू : देवरीत म्हैस वाहून गेली
गोंदिया : मंगळवारी (दि.५) आलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळील झाले होते. नदी-नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणची वाहतून ठप्प पडली. त्यामुळे ५ व ६ आॅगस्ट या दोन दिवसांत गोंदिया आगाराच्या एकूण १०६ फेऱ्या रद्द होवून पाच हजार ५२४ किमीचा प्रवास बसेस करू शकल्या नाहीत.
पुजारीटोला धरणाची ८ दारे ६० सेंमीने तर शिरपूर जलाशयाची ७ दारे ६० सेंमीने उघडण्यात आले आहेत. कालीसराड जलाशयाची दारे बुधवारी सकाळी बंद करण्यात आली. कालीसराड आणि शिरपूर धरणाचे पाणी पुजारीटोला धरणात येत आहे. रजेगाव पुलावर बुधवारी सायंकाळी ५० सेंमीपर्यंत पाणी वाहात असून रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत पुलावरील पाणी कमी होऊन वाहतूक सुरू होईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
५ आॅगस्ट रोजीच्या संततधार पावसामुळे रजेगाव येथील वाघनदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे गोंदिया आगाराच्या गोंदिया-रजेगाव-बालाघाट या मार्गाच्या एकूण ४५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. कामठा-गिरोला मार्गावरील घाटटेमणी येथील नाल्यात वाघनदीचे पाणी उलटे शिरत आले. त्यामुळे घाटटेमणीच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहात होते. त्यामुळे गोंदिया आगारातून धावणाऱ्या कामठा-गिरोला मार्गावरील दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ११३ किमीचा प्रवास बसेस करू शकल्या नाही. तसेच गंगाझरी ते दवनीवाडा मार्गावरील खळबंदा जवळील नाल्याच्या पुलावर पुराच्या पाण्यामुळे तीन ते चार फूट खोल मोठा खड्डा पडल्याने या मार्गावरील वाहतून बंद पडली होती. त्यामुळे गंगाझरी-दवनीवाडा या मार्गावरील गोंदिया आगाराच्या सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे २३० किमीचा प्रवास गोंदिया आगाराच्या बसेस करू शकल्या नाही.
त्यामुळे ५ आॅगस्ट रोजी गोंदिया आगाराच्या एकूण ५३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या व बसेस एकूण दोन हजार ७६२ किमीचा प्रवास करू शकल्या नाही. हीच स्थिती दुसऱ्या दिवशी ६ आॅगस्ट रोजी सुद्धा होती. त्यामुळे एवढ्याच फेऱ्या व किमीचा प्रवास रद्द करण्यात आला. त्यामुळे या दोन दिवसात गोंदिया आगाराच्या एकूण १०६ फेऱ्या रद्द झाल्या व एकूण पाच हजार ५२४ किमीचा प्रवास होवू शकला नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला या रद्द झालेल्या किमीचा तोटा सहन करावा लागेल.
याशिवाय वाघ नदीला आलेल्या पुरामुळे तिरोडा आगाराच्या तिरोडा-रजेगाव-बालाघाट या मार्गाच्या एकूण १६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एकंदरीत या दोन दिवसात अनेक ठिकाणचा संपर्क तुटला तर काही ठिकाणी नुकसानही झाले. देवरी तालुक्यातील नेताखेडा येथील रहिवासी चिंतामन बलसिंग धानवा यांची म्हैस नेताखेडा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. ही घटना मंगळवार (दि.५) सायंकाळी ४ वाजता घडली.