१०.५० कोटींच्या विकास कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:39 PM2018-02-08T20:39:33+5:302018-02-08T20:40:35+5:30

गोंदिया विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्यात आलेल्या १०.५० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

 10.50 crore development work started | १०.५० कोटींच्या विकास कामाला सुरूवात

१०.५० कोटींच्या विकास कामाला सुरूवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्यात आलेल्या १०.५० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यांतर्गत, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत ४.६० कोटींच्या ग्राम कामठा ते नवरगावकला रस्ता सिमेंटीकरण व डांबरीकरण, तिर्थ क्षेत्र विकास योजनेंतर्गत १५ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर लहरी आश्रम जवळील रस्ता सिमेंटीकरण, ग्राम लोधीटोला (सावरी) येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १.४३ कोटींच्या निधीतून मंजूर ग्राम लोधीटोला ते रावणवाडी रस्ता सिमेंटीकरण व डांबरीकरण, ग्राम टेमनी येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत १.७६ कोटींच्या निधीतून ग्राम टेमनी ते पाटीलटोला (आसोली) रस्ता सिमेंटीकरण व डांबरीकरण, ग्राम पिपरटोला येथे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत २.५८ कोटींच्या ग्राम पिपरटोला ते झिटाबोडी (दासगाव) रस्ता सिमेंटीकरण व डांबरीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, विकासकामे आणून क्षेत्राला सुजलाम-सुफलाम करणे आमची प्राथमिकता आहे. क्षेत्रातील मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम आम्ही करीत असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. कार्यक्रमाला चमन बिसेन, विजय लोणारे, कमलेश्वरी लिल्हारे, शेखर पटेल, खुशबू टेंभरे, भोजराज चुलपार, प्रकाश डहाट, बंटी भेलावे, हरिचंद कावळे, शकर नारनवरे, अखिलेश सेठ, इंद्रायणी धावडे, डुलेश्वरी लिल्हारे, प्रमिला करचाल, सत्यम बहेकार, संतोष घरसेले, हुकुम नागपुरे, सावलराम महारवाडे, टिकाराम भाजीपाले, गोपालबाबा खरकाटे, लिलेश्वर कुंभरे, प्रकाश शेवतकर, सुनंदा गजभिये, राकेश कुंभलवार, चेतन नागपुरे, केशव तावाडे, इंदू वंजारी, कुवरलाल बहेकार, कल्पना खरकाटे, रमेश लिल्हारे, डिलेश्वरी पटले यांच्यासह अन्य पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
 

Web Title:  10.50 crore development work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.