१०३५ उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा

By Admin | Updated: June 25, 2014 23:49 IST2014-06-25T23:49:10+5:302014-06-25T23:49:10+5:30

परिक्षा शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजतापासून ११.४५ वाजता पर्यंत घेण्यात आली. लेखी परिक्षेसाठी १०७० उमेदवार पात्र झाले होते. परंतु लेखी परिक्षेला ३५ उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे १०३५ उमेदवारांनी लेखी

1035 candidates gave written test | १०३५ उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा

१०३५ उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा

३५ उमेदवार गैरहजर : उत्तरपत्रिका उपलब्ध$$्न्न्निेगोंदिया : जिल्ह्यातील ७६ पोलीस शिपाई पदासाठी घेत असलेल्या भरतीची लेखी परिक्षा शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजतापासून ११.४५ वाजता पर्यंत घेण्यात आली. लेखी परिक्षेसाठी १०७० उमेदवार पात्र झाले होते. परंतु लेखी परिक्षेला ३५ उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे १०३५ उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली आहे.
गोंदिया जिल्ह्यासाठी यावर्षी शासनाने फक्त २३ नवीन जागा दिल्या आहेत. नवीन असलेल्या २३ जागा व सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या ५३ जागा अशा ७६ जागांची पोलीस शिपाई भरती जून महिन्यात घेण्यात आली.
या भरतीचा शेवटचा टप्पा लेखी परिक्षा शुक्रवारी मुर्रीच्या भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात घेण्यात आली. ७६ जागांसाठी ४२०० अर्ज आले होते. या अर्जदारांचे कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी पात्र आहेत किंवा नाही याची पडताळणी केल्यावर शारिरीक चाचणीसाठी २२५० उमेदवार पात्र ठरले. त्यातील १०७० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. अत्यंत पारदर्शकरित्या ही संपुर्ण भरती प्रक्रिया करण्यात आली. लेखी परिक्षा देणाऱ्या उमेदवारांत ८०२ पुरूष तर २३३ महिला आहेत. गैरहजर असणाऱ्यांमध्ये ६ महिला व २९ पुरूष आहेत. १०० गुणांसाठी उमेदवारांना दिड तासाचा वेळ देण्यात आला होता. भारतीय खाद्य निगमच्या चार गोदामात ही लेखी परिक्षा घेण्यात आली.
पेपर ए, बी, सी, डी अशा चार संचात होता. या पेपरची उत्तरपत्रिका शुक्रवारीच पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस मुख्याल, जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे, महाराष्ट्र पोलीस व गोंदिया पोलीसच्या वेबसाईटवर टाकण्यात आली. स्वत: पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके यांनी उपस्थीत राहून ही परीक्षा घेतली. पावसाचा फटका भरती प्रक्रियेला बसू नये यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम उपलब्ध करून दिल्यामुळे खाद्य निगमचे पोलीस उप अधिक्षक गृह सुरेश भोयर यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 1035 candidates gave written test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.