१००१ दिव्यांची महाआरती
By Admin | Updated: October 26, 2015 01:57 IST2015-10-26T01:57:16+5:302015-10-26T01:57:16+5:30
नवरात्रीचे औचित्य साधून लोकमत सखी मंच व रास गरबा उत्सव समिती गोविंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गरबा मैदानात १००१ दिव्यांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

१००१ दिव्यांची महाआरती
लोकमत सखी मंच : २८ आॅक्टोबरला फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन
गोंदिया : नवरात्रीचे औचित्य साधून लोकमत सखी मंच व रास गरबा उत्सव समिती गोविंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गरबा मैदानात १००१ दिव्यांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलाल दर्जा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून सुनील केलनका, नगरसेवक गप्पू गुप्ता, भरत क्षत्रिय, पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, किशोर इलानी, शिव शर्मा, संजय मुरकुटे, पप्पू भादुभुते, विजय उके, नगरसेविका भावना कदम उपस्थित होते.
याप्रसंगी १००१ दिव्यांच्या आरतीने देवीची महाआरती करण्यात आली. तसेच आरती सजावट स्पर्धा घेण्यात आली. यात अनमोल अग्रवाल प्रथम, आरती राणे द्वितीय तर श्रद्धा मिश्राने तृतीय क्रमांक मिळविला. परीक्षकाचे कार्य योगिनी पथ्थे व नेहा साठवणे यांनी सांभाळले. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक संयोजिका दिव्या भगत यांनी मांडले. संचालन दिलीप कोसरे यांनी केले. आभार राकेश लांजेवार यांनी मानले.
कार्यक्रमासाठी कुशल अग्रवाल, चेतानंद लांजेवार, तुलाराम ढबाले, उमेश शहारे, सतीश कनोजिया, राज मिश्रा, हर्ष तिवारी, अशोक भागडकर, संतोष मेश्राम, माधो ठाकरे, दिनेश फरकुंडे, राजेश कावळे, विपुल अग्रवाल, सुरेश ठाकरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)