परिमंडळात १ हजार गो-ग्रीन ग्राहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:55+5:30
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून बहुतांश व्यवहार आज ऑनलाईन केले जात आहेत. कॉम्प्युटर व मोबाईलवर एक क्लीक करून दैनंदिन व्यवहार केले जात आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे कामकाज व पैशांची देवाण-घेवाण सुद्धा ऑनलाईन होत असून हा पर्याय अगदी सुलभ व सुरक्षित असल्याने नागरिकांचा कल आता ऑनलाईन व्यवहारांकडे वाढू लागला आहे.

परिमंडळात १ हजार गो-ग्रीन ग्राहक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्यांना महावितरणकडून दमरहा १० रूपये म्हणजेच वार्षिक १२० रूपयांची सुट दिली जाणार आहे. यासाठी ग्राहकांना गो-ग्रीन पर्याय निवडायचा असून त्यांना ई-मेल व एसएमएसच्या माध्यमातून बिल पाठविले जाईल. असे असतानाही मात्र गोंदिया परिमंडळात आजघडीला १ हजार ८१ ग्राहक गो-ग्रीनचा पर्याय निवडला असल्याची माहिती आहे.
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून बहुतांश व्यवहार आज ऑनलाईन केले जात आहेत. कॉम्प्युटर व मोबाईलवर एक क्लीक करून दैनंदिन व्यवहार केले जात आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे कामकाज व पैशांची देवाण-घेवाण सुद्धा ऑनलाईन होत असून हा पर्याय अगदी सुलभ व सुरक्षित असल्याने नागरिकांचा कल आता ऑनलाईन व्यवहारांकडे वाढू लागला आहे. यामुळेच कित्येक प्र्रकारचे बिल सुद्धा ऑनलाईन भरून नागरिक मोकळे होत आहेत. महावितरणनेही हीच बाब हेरत ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यांतर्गत वीज बिल बघण्यासाठी महावितरणने ग्राहकांना अॅप व संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा असतानाही महावितरणकडून ग्राहकांना छापील बिल दिले जात आहेत. कागदी बिल देताना त्यात कागदाचा वापर आलाच व कागद झाडांपासून तयार होत असल्याने पर्यावरणाचाच हा एक भाग ठरत आहे. अशात पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून दरमहा १० रूपये म्हणजेच वार्षिक १२० रूपयांची सुट जाहीर केली आहे.
यासाठी वीज ग्राहकांना गो-ग्रीनचा पर्याय निवडायचा असून त्यांना आपल्या वीज बिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करावयाची आहे. मात्र गोंदिया परिमंडळात १ हजार ८१ ग्राहक गो-ग्रीनचा पर्याय निवडणारे असल्याची माहिती आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गो-ग्रीनचा पर्याय अत्यंत उपयुक्त असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी हा पर्याय निवडण्याची गरज आहे.