१० ग्रामपंचायतींचे प्रभाग आरक्षण जाहीर
By Admin | Updated: February 7, 2015 23:27 IST2015-02-07T23:27:16+5:302015-02-07T23:27:16+5:30
तालुक्यातील कारुटोला, कावराबांध, कोटजंभोरा, कोटरा, मानागड, मुंडीपार, पाऊडदौना, पोवारीटोला, सालेकसा, सातगाव येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ यावर्षी संपत असल्यामुळे

१० ग्रामपंचायतींचे प्रभाग आरक्षण जाहीर
सालेकसा : तालुक्यातील कारुटोला, कावराबांध, कोटजंभोरा, कोटरा, मानागड, मुंडीपार, पाऊडदौना, पोवारीटोला, सालेकसा, सातगाव येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ यावर्षी संपत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३४ प्रभागातील ९२ सदस्यांपैकी ७ अनुसूचित जाती, २१ अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांसाठी २३, सर्वसाधारणसाठी ४१ जागांचे आरक्षण निश्चित झाले आहे.
कारुटोला ग्रामपंचायतची लोकसंख्या ३६५८ आहे. ४ प्रभागातील ११ सदस्यांपैकी अनुसूचित जातीसाठी १ (स्त्री), नामाप्रसाठी २ (स्त्री), सर्वसाधारण स्त्रीसाठी २ जागा राखीव आहेत. कावराबांध ग्रामपंचायतची लोकसंख्या ३३४६ असून ४ प्रभागातील ११ सदस्यांपैकी नामाप्र महिला २, सर्वसाधारण महिलासाठी ४ जागा राखीव आहेत. कोटजंभोरा ग्रामपंचायतची लोकसंख्या ११९१ असून ३ प्रभागातील ७ जागेपैकी अनुसूचित जातीसाठी १, नामाप्र महिलेसाठी १, सर्वसाधारण महिलेसाठी १ जागा आरक्षीत आहेत.
कोटरा ग्रामपंचायतीची लोकसंख्या २२२६ असून ३ प्रभागातील ९ जागेपैकी अनुसूचित जमाती स्त्री १, अनुसूचित जमाती स्त्री २, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला १ जागा राखीव आहे. मानागड येथील लोकसंख्या १४७३ असून ३ प्रभागातील ७ जागांपैकी अनुसूचित जमाती स्त्री ३ जागा, ओबीसी महिला महिला १ जागा राखीव आहे. मुंडीपार ग्रामपंचायतची लोकसंख्या ३०७४ असून ४ प्रभागातील ११ जागेपैकी अनुसूचित जाती महिला १, जमाती महिला १, ओबीसी महिला २, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत.
पाऊलदौना ग्रामपंचायतची लोकसंख्या २५५९ असनू ३ प्रभागातील ९ जागेपैकी अनु. जाती महिला १ जागा, जमाती महिला १ जागा, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत. पोवारीटोला ग्रामपंचायतची ९२३ लोकसंख्या असून ३ प्रभागातील ७ जागेपैकी अनु. जमाती महिला १, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत. सालेकसाची ३६९० लोकसंख्या असनू ४ प्रभागातील ११ जागेसाठी अनु. जाती महिला १, जमाती महिला ३, ओबीसी महिला २ जागा राखीव आहेत. सातगाव ग्रामपंचायतची लोकसंख्या २४८२ असून ३ प्रभागातील ९ जागेसाठी अनु. जाती महिला १, अनु. जमाती महिला १, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत.
एकूण ९२ ग्रा.पं. सदस्यांपैकी ५१ महिलासाठी जागा राखीव असून अनुसूचित जातीसाठी ७, अनु. जमातीसाठी १३, ओबीसी १४, सर्वसाधारण १७ जागेवर महिलांसाठी आरक्षण आहे. (तालुका प्रतिनिधी)