शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

३ लाखांच्या दारूसह १० लाखाचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून दारुची तस्करी केली जात आहे. चिचगड पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईनंतर दारु तस्करी होत असल्याच्या वृत्तावर शिक्का मोर्तब झाला आहे.

ठळक मुद्देपेट्रोलिंग दरम्यान पकडले : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाणारी दारू चिचगडच्या पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांच्या चमूने पकडली. ही कारवाई १२ आॅक्टोबरच्या पहाटे ४.१५ वाजता दरम्यान करण्यात आली.महाका गावाकडून पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ सीजी ०७ एएम ७००६ या वाहनात व्हिस्कीचे १८० मिली बॉटलचे ३८ बॉक्स किंमत एक लाख ९० हजार, ब्ल्यू व्हिस्की १५ चच्या १८० मिलीचे ४८ नग बॉटल किंमत १ लाख ८ हजार अशी एकूण २ लाख ९८ हजाराची दारू व ७ लाख रूपये किंमतीची स्कार्पिओ असा एकूण ९ लाख ९८ हजाराचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस हवालदार भाटीया, गिऱ्हेपुंजे यांनी केली आहे. यासंदर्भात आरोपी द्वारका उर्फ राजू पलटन वर्मा (२७) रा.खुलेंद्राता डोेंगरगड व सिध्दार्थ संजय सोनकुवत (१९) रा.भिलाई यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई), ७७ (अ), ७२, ८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तस्करीत वाढमहाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून दारुची तस्करी केली जात आहे. चिचगड पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईनंतर दारु तस्करी होत असल्याच्या वृत्तावर शिक्का मोर्तब झाला आहे.पोलीस आणि निवडणूक विभागाची यंत्रणा सज्जविधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश , छत्तीसगड राज्यातून दारु आणि पैशाची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आणि निवडणूक विभागाने सीमा तपासणी नाक्यावर चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावले आहेत.आत्तापर्यंत लाखो रुपयांचा दारु साठा जप्तविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबरपासून लागू झाली तेव्हापासूनच पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा सुध्दा सज्ज झाली. पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके स्थापन केले असून आत्तापर्यंत पोलिसांनी लाखो रुपयांच्या दारुचा साठा जप्त केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी