1 lakh worth of liquor seized with 1 lakh liquor | ३ लाखांच्या दारूसह १० लाखाचा माल जप्त
३ लाखांच्या दारूसह १० लाखाचा माल जप्त

ठळक मुद्देपेट्रोलिंग दरम्यान पकडले : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाणारी दारू चिचगडच्या पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांच्या चमूने पकडली. ही कारवाई १२ आॅक्टोबरच्या पहाटे ४.१५ वाजता दरम्यान करण्यात आली.
महाका गावाकडून पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ सीजी ०७ एएम ७००६ या वाहनात व्हिस्कीचे १८० मिली बॉटलचे ३८ बॉक्स किंमत एक लाख ९० हजार, ब्ल्यू व्हिस्की १५ चच्या १८० मिलीचे ४८ नग बॉटल किंमत १ लाख ८ हजार अशी एकूण २ लाख ९८ हजाराची दारू व ७ लाख रूपये किंमतीची स्कार्पिओ असा एकूण ९ लाख ९८ हजाराचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस हवालदार भाटीया, गिऱ्हेपुंजे यांनी केली आहे. यासंदर्भात आरोपी द्वारका उर्फ राजू पलटन वर्मा (२७) रा.खुलेंद्राता डोेंगरगड व सिध्दार्थ संजय सोनकुवत (१९) रा.भिलाई यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई), ७७ (अ), ७२, ८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तस्करीत वाढ
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून दारुची तस्करी केली जात आहे. चिचगड पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईनंतर दारु तस्करी होत असल्याच्या वृत्तावर शिक्का मोर्तब झाला आहे.
पोलीस आणि निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज
विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश , छत्तीसगड राज्यातून दारु आणि पैशाची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आणि निवडणूक विभागाने सीमा तपासणी नाक्यावर चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावले आहेत.
आत्तापर्यंत लाखो रुपयांचा दारु साठा जप्त
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबरपासून लागू झाली तेव्हापासूनच पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा सुध्दा सज्ज झाली. पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके स्थापन केले असून आत्तापर्यंत पोलिसांनी लाखो रुपयांच्या दारुचा साठा जप्त केला आहे.


Web Title: 1 lakh worth of liquor seized with 1 lakh liquor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.