१ लाख ७४ हजाराचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:41 IST2018-02-28T22:41:41+5:302018-02-28T22:41:49+5:30

गोंदिया रेल्वे स्थानकाचा फलाट क्रं. ३ वर गीतांजली एक्स्प्रेसने उतरलेल्या दोन तरुणांजवळून १७ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ७४ हजार ६०० रुपये असल्याचे सांगितले.

1 lakh 74 thousand ganja seized | १ लाख ७४ हजाराचा गांजा जप्त

१ लाख ७४ हजाराचा गांजा जप्त

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाचा फलाट क्रं. ३ वर गीतांजली एक्स्प्रेसने उतरलेल्या दोन तरुणांजवळून १७ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ७४ हजार ६०० रुपये असल्याचे सांगितले.
ज्या तरुणाकडून गांजा जप्त करण्यात आला. त्यात ओडीसा येथील पौध जिल्ह्यातील खुटीयापाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या न्युआपाली येथील शांतनु गोविंद बेहरा (३२) व श्रीधर पूर्णचंद बेहरा (२१) यांचा समावेश आहे. ते दोघे ही गीतांजली एक्सप्रेसने उतरुन घाईत जात असताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम व बघेले यांच्या चमूची नजर त्याच्यांवर गेली. त्या दोघांना ताब्यात घेऊन दोन पॅकेटमध्ये असलेला गांजा जप्त करण्यात आला. एका पॉकेटमध्ये ९ किलो तर दुसऱ्या पॉकेटमध्ये ८ किलो गांजा होता.
त्या दोघांना रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदारांना बोलावून जप्तीची कारवाई करण्यात आली. मादक पदार्थ अधिनियमान्वये सदर कारवाई करण्यात आली.
रावणवाडी येथे नेत होते गांजा
आपल्या गावावरुन गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी येथे सदर गांजा नेत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीनी दिली. तिथे कुणीतरी अज्ञात व्यक्ती तो गांजा घेऊन जात होता. त्या व्यक्तीला अटक झालेले आरोपी ओळखत असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

Web Title: 1 lakh 74 thousand ganja seized

टॅग्स :Crimeगुन्हा