१ लाख २८ हजार खड्डे वृक्षारोपणाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:53+5:30

वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी १७ लाख १३ हजार ७५० खड्डे संबधीत ग्रामपंचायतींनी खोदले.

1 lakh 28 thousand pits without tree planting | १ लाख २८ हजार खड्डे वृक्षारोपणाविनाच

१ लाख २८ हजार खड्डे वृक्षारोपणाविनाच

ठळक मुद्देयंदा ३३ कोटी वृक्ष लागवड योजना वांद्यात । सत्ता बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे ठेवून वृक्षारोपण केले होते. परंतु दिलेल्या उद्दिष्टापैकी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींनी एक लाख २८ हजार ३६९ खड्डे खोदल्यानंतरही त्यात वृक्षारोपणच करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी १७ लाख १३ हजार ७५० खड्डे संबधीत ग्रामपंचायतींनी खोदले. वृक्षलागवडासाठी जिल्ह्यातील २२ हजार १८८ जणांचा लोकसहभाग होता. या लोकसहभागातून खोदण्यात आलेल्या खड्यांमध्ये रोपटे लावून वृक्षसंवर्धन करायचे होते. परंतु १५ लाख ८५ हजार ३८१ रोपटे लावण्यात आले होते. उर्वरीत १ लाख २८ हजार ३६९ खड्यांमध्ये वृक्षारोपणच करण्यात आले नाही.
शासनाने गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही. खोदलेल्या खड्यांसाठी रोपटे देखील मागविण्यात आले. परंतु त्या खड्यात रोपटे लावण्यात आले नाही. काही ग्रामपंचायतींनी रोपटे न लावता ते बाहेर फेकून दिले होते. शासनाने वृक्षलागवडीसाठी निधी दिला नव्हता त्यामुळे ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलल्या जाते.

यंदाचा पावसाळा वृक्षलागवडीविना
पावसाळ्यात दरवर्षी एकाच खड्यात अनेकदा रोपटे लावले जात असल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी अनेक रोपटे जगले आणि त्यांचे संवर्धनही करण्यात आले. परंतु वृक्ष लागवडीकडे तत्कालीन सरकारचे लक्ष होते. आता ठाकरे सरकार आले. परंतु या ठाकरे सरकारला कोरोना या विषाणूशी लढा देण्यातच वेळ लागत असल्याने वृक्षलागवडीचा संकल्प यंदा मागे पडला. यंदाच्या पावसाळ्यात स्वयंत्स्फूर्तीने वृक्ष लागवड केल्यास वृक्ष लागवड होईल. अन्यथा यंदाचा पावसाळा वृक्षलागवडीविना जाणार आहे.

Web Title: 1 lakh 28 thousand pits without tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.