‘त्या ’ माऊलीच्या हाताने भरली त्यांची ओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:20+5:30

समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या ह्या माऊलीच्या हाताने भीक मागणाऱ्या मातांची ओटी सविता बेदरकर यांच्या राहत्या घरी भरण्यात आली.ज्या वस्तीमध्ये कुणी जात नाही, ते दारावर आले तरी दुसरा दरवाजा पहा अस ज्यांना म्हटले जाते. महानाईकांच्या फोटोला प्रणाम करून त्या स्त्रियांना नवीन साडीचोळी, मुलींना नोटबुक, पेन आणि जेवणाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला.

- | ‘त्या ’ माऊलीच्या हाताने भरली त्यांची ओटी

‘त्या ’ माऊलीच्या हाताने भरली त्यांची ओटी

ठळक मुद्देसाडीचोळी भेट : नवकन्यांचे भोजन गरजूंनाच दिले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कधी भीक मागून तर कधी भंगार वेचून, तर कधी कचरा वेचून उदरिनर्वाह करणाऱ्या मांगगारूडी समाज कुडवाच्या अण्णाभाऊ साठे नगरातील महिलांची ओटी आणि नवकन्याचे पूजन त्या माऊलीने केले. पती कोमामध्ये असताना अत्यंत संवेदनशील अवस्थेत आपल्या पतीचे अवयव दान करून तिने आपल्या पतीला अवयव रूपाने जिवंत ठेवण्याचे काम करणाऱ्या माऊलीचे नाव मनीषा नशिने आहे.
समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या ह्या माऊलीच्या हाताने भीक मागणाऱ्या मातांची ओटी सविता बेदरकर यांच्या राहत्या घरी भरण्यात आली.ज्या वस्तीमध्ये कुणी जात नाही, ते दारावर आले तरी दुसरा दरवाजा पहा अस ज्यांना म्हटले जाते. महानाईकांच्या फोटोला प्रणाम करून त्या स्त्रियांना नवीन साडीचोळी, मुलींना नोटबुक, पेन आणि जेवणाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला. पर्यावरण पूरक हिरव्या पत्रावळी, हिरव्या साड्या खणानारळाची ओटी, स्त्रियांना गोडधोड पदार्थ देऊन त्यांची पाठवणी करण्यात आली. त्या वेळी त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.
निशिगंधाचा गजरा, पदराखाली असलेल्या मुली, आज देवीचे पूजन केल्याचं समाधान सगळ्या स्त्रियांच्या चेहºयावर दिसत होता. साधारणत: नवकन्यांचे पूजन करताना आजूबाजूच्या मुलींना जेवणासाठी बोलावले जाते. या परंपरेला फाटा देऊन ज्यांच्या जेवणाचे सदैव वांदे असतात आणि लोकांच्या तुकड्यावर ज्यांना गुजरान करावी लागते अशा समाजातील मुलींना आणि त्यांच्या आईंचे यानिमित्ताने पूजन करण्यात आले. नवीन साड्या, नवीन अलंकार, पोटात गरम-गरम अन्न गेल्याने समाधानाने त्यांचे चेहरे भरून गेले होते. तृप्तीचा ढेकर देत प्रसन्न मनाने निशिगंधाचा गजरा त्यांनी केसात माळला होता.

मातृवत्सल सुहासिनीचे स्वागत
पती कोमामध्ये गेल्याच दु:ख बाजूला सारून सात लोकांचा आयुष्य सजविण्यासाठी त्यांना जीवनदान देण्यासाठी जी मनीषा नशिने हिने आपल्या काळजावर दगड ठेवून इतर स्त्रियांचे सौभाग्य सुरिक्षत ठेवण्यासाठी मदत केली.आणि ती मदत अवयवाच्या रूपाने आपल्या पतीला ज्या सावित्रीने अमर करण्याचा प्रयत्न केला तिच्या हाताने ओटी भरून ह्या मातृवत्सल सुहासिनीचे स्वागत करण्यात आले. ह्या उपक्र मासाठी डॉ. सविता बेदरकर, प्रा.नीता बागडे,आरती चवारे,नानन बिसेन, यशोधरा सोनवने, मनीषा नशिने, हिमेश्वरी कावडे, वैशाली कोहपरे, शालू कृपाले ,दिव्या भगत, प्राध्यापक, तुरकर, प्रार्थना कुंभलवार यांनी सहकार्य केले.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.