चाकूने वार केल्याने युवक गंभीर जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 15:45 IST2024-03-23T15:41:40+5:302024-03-23T15:45:20+5:30

एकूण ६४ हून जास्त ठिकाणी त्या युवकावर चाकूने वार करण्यात आले आहे.

Youth seriously injured due to stabbing | चाकूने वार केल्याने युवक गंभीर जखमी  

चाकूने वार केल्याने युवक गंभीर जखमी  

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हापसा : म्हापसा येथील घाटेश्वरनगर-खोर्ली परिसरात भाड्याने राहणाऱ्या मोहम्मद उस्मान (वय २२, उत्तर प्रदेश) या  युवकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात युवकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करण्यात आल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. 

एकूण ६४ हून जास्त ठिकाणी त्या युवकावर चाकूने वार करण्यात आले आहे. हल्ला करणारे हल्लेखोर घटना स्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी त्यांचे शोध कार्य आरंभले आहे. घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. हल्ला करण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. 

मोहम्मद उस्मान हा रात्रीच्यावेळी घराबाहेर फिरायला आला असता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार चाकूने वार करायला आरंभ केला. हल्ल्यानंतर  भयभीत झालेल्या  उस्मान यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत नंतर त्याच्या भावाने त्याला आरंभी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला बांबोळीत हलवण्यात आले. 

शुक्रवारी कांदोळी येथे तीन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तालुक्यातील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. म्हापसा पोलियांनी या संबंधी तपास कार्य आरंभले आहे.

Web Title: Youth seriously injured due to stabbing