तरुणीनं क्लबमध्ये मजा करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं?
By वासुदेव.पागी | Updated: August 9, 2023 12:00 IST2023-08-09T11:57:06+5:302023-08-09T12:00:10+5:30
ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. कळंगूट येथील एका क्लबमध्ये हा अधिकारी गेला होता.

तरुणीनं क्लबमध्ये मजा करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं?
पणजी - एका युवतीने क्लबमध्ये मजा करण्यासाठी गेलेल्या गोवापोलिसातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. याअधिकाऱ्याच्या कारनाम्यामुळेच त्याला हातचा प्रसाद चाखावा लागला, अशी चर्चा आहे.
ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. कळंगूट येथील एका क्लबमध्ये हा अधिकारी गेला होता. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार क्लबमध्ये नाचणाऱ्या एका युवतीशी त्याने गैरवर्तन केले आणि त्यामुळे संतापलेल्या तरुणीने साहेबाच्या कानशिलात लगावली.
त्या युवतीला हे साहेब पोलीस अधिकारी असल्याचे ठावूक नव्हते. थोबाडीत दिल्यानंतर कुणी तरी तिच्या ते पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. यानंतर हे प्रकरण तिथेच मिटविण्यात आले. युवतीने तक्रार वगैरे नोंदविली नाही.
दरम्यान हे प्रकरण पोलीस मुख्यालयात मंगळवारी चर्चेचा विषय बनला होता. याप्रकाराची खात्यांतर्गत चौकशीही सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा अधिकारी कामापेक्षा पार्ट्या करण्यातच अधिक रस घेत असल्याचे त्याच्याजवळ असलेले कर्मचारी खाजगीत सांगतात. तसेच कर्मचाऱ्यांशी त्यांचे वर्तनही चांगले नसल्याच्याही तक्रारी आहेत.