घशात लोंखडी सळी घुसली: कामागाराचा मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: May 9, 2024 21:38 IST2024-05-09T21:37:34+5:302024-05-09T21:38:11+5:30

प्रविण कुमार कन्नाउजिया (२४) असे मयताचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाझिपूर येथील रहिवाशी आहे.

worker's death in the company in goa | घशात लोंखडी सळी घुसली: कामागाराचा मृत्यू

घशात लोंखडी सळी घुसली: कामागाराचा मृत्यू


मडगाव: गोव्यातील सासष्टीमधील कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत काम करताना घशात लोखंडी सळी घुसल्याने एका कामगाराचा दुदैवी मृत्यू होण्याची घटना घडली. आज गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रविण कुमार कन्नाउजिया (२४) असे मयताचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाझिपूर येथील रहिवाशी आहे.

मेर्सस ग्लोबल इस्पिता कंपनीत ही घटना घडली. कामावर असताना कामगाराला कुठलेही सुरक्षा उपकरणे दिली नव्हती असे प्राथमिक पोलीस तपासात आढळून आले आहे. मयताच्या मृत्यूस निष्काळजीपणा जबाबदार होता. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी प्रकल्पाचे सर्वे्क्षक विमल सिंग, प्रोडेक्शन मॅनेजर सतीश सिंग व मेसर्स ग्लाेबल इस्पात कंपनी व्यवस्थापकावर भादंसंच्या ३०४ (अ) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत. मयत अविवाहीत हाेता. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पि्तळाच्या शवागारात ठेवला आहे.

Web Title: worker's death in the company in goa