जुन्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटणार; दामोदर नाईक यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:59 IST2025-04-06T12:58:22+5:302025-04-06T12:59:08+5:30

काणकोण येथे मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा उत्साहात

will visit old party workers at their homes said damodar naik | जुन्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटणार; दामोदर नाईक यांचे प्रतिपादन

जुन्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटणार; दामोदर नाईक यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : भारतीय जनता पक्ष सर्वांचा पक्ष असून, हा परिवार आहे. या परिवारातील ज्या व्यक्ती विखुरल्या आहेत, त्यांना एकत्र करण्याचे काम आपण करणार आहे. त्याकरिता जुन्या कार्यकर्त्यांच्या घरोघर भेटी देणार व २०२७ ला २७ आमदार निवडून आणणार, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी व्यक्त केला.

राजबाग तारीर येथे काणकोण मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्यात नाईक बोलत होते. यावेळी सभापती रमेश तवडकर, नगराध्यक्ष सारा शंभा देसाई, प्रदेश सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा अध्यक्ष प्रभाकर गावकर, उपाध्यक्ष महेश नाईक, मंडळ अध्यक्ष प्रभाकर गावकर व मावळते अध्यक्ष विशाल देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. दामोदर नाईक म्हणाले, की भाजपचा इतिहास कार्यकर्त्यांना माहीत असायला हवा. सरकारने दिलेल्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवायला हवी.

भाजप पंचायत निवडणुका, जिल्हा पंचायत निवडणुका, पालिका निवडणुकासुद्धा गंभीरतेने घेत असून, त्याकरिता घरोघर संपर्कावर भर देत असतो, असे तवडकर यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित मंडळ सदस्यांचा भाजपची सत्कार करण्यात आला. मान्यवरांना तन्वी कोमरपंत, संजू तिळवे, अशोक गावकर, विंदा सतरकर यांनी पुष्पगुच्छ प्रदान केले. सुरुवातीला सरपंच निशा च्यारी व सांगाती यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन दिवाकर पागी यांनी केले. प्रभाकर गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर संजीव तिळवे यांनी आभार मानले.

काणकोणमध्ये आठ तास पाणी मिळणार

यावेळी सभापती तवडकर यांच्या हस्ते दामोदर नाईक, प्रभाकर गावकर, महेश नाईक, विशाल देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तवडकर यांनी सांगितले, काणकोणचा विकास साधणे हे आपले कर्तव्य ठरत असून, वीज खात्यातर्फे २०० कोटींपेक्षा अधिक कामे, रस्ते, साधन सुविधा निर्माण करण्याची संधी मिळाली. काणकोणवासीयांना दिवसाला आठ तास तरी पाणी मिळावे, ही माझी इच्छा असून, त्यादृष्टीने ३८ कोटी खर्चुन गावणे धरणाचे काम करण्यात येईल. उपाशीपोटी क्रांती होत नसून रोजगाराच्या दृष्टीने ही पावले उचलली आहेत.

 

Web Title: will visit old party workers at their homes said damodar naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.