स्थानिकांची घरे पाडण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:32 IST2025-08-08T08:31:22+5:302025-08-08T08:32:12+5:30
आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

स्थानिकांची घरे पाडण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सांतआंद्रे मतदारसंघात नेवरा येथील लोकांची घरे पाडण्याची धमकी देणाऱ्यांविरुद्ध तक्रार द्या, कारवाई करतो, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार बोरकर यांनी, या ठिकाणी ज्या बिगर गोमंतकीय लोकांनी जमिनी घेतल्या आहेत, त्यात पारंपरिक रस्ता येत आहे आणि ते रस्त्याचा वापर लोकांना करण्यास अटकाव करीत आहेत. लोकांना त्यांची घरे पाडण्याची धमकी देत आहेत' अशी माहिती दिली होती. या लोकांना कोण आवरणार? असा त्यांनी प्रश्न केला. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगतले की त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवावी, त्यांच्यावर कारवाई करू.
मुख्यमंत्री म्हणाले की 'आम्ही लोकांची घरे वाचवण्यासाठी पाहतो आहोत आणि हे कोण आले घरे पाडणारे? पोलिस तक्रार केल्यावर त्वरीत कारवाई करण्यास सांगतो' यावर आमदार बोरकर यांनी सांगितले की यासंबंधी यापूर्वीच आगशी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. परंतु पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही' असेही त्यांनी सांगितले. तसे असेल तर यात आपण स्वतः लक्ष घालून कारवाई करायला असे मुख्यमंत्र्यांनी यावर सांगतो सांगितले.
ते स्थानिकांना धमक्या देतात : वीरेश बोरकर
नेवरा येथील सर्व्हे क्रमांक १४।१ १ आणि १५.१ मधील जमिनी संबंधी सविस्तर माहिती आमदार वीरेश मागितली होती. या जमिनीत करण्यात आलेले प्लॉट्स आणि ते विकसित करण्यासाठी देण्यात आलेले विविध परवाने याच्यासह त्या भागात नगर नियोजन खात्याडून करण्यात आलेली पाहणी आणि अहवाल यासंबंधी माहिती त्यांनी मागितली होती.
तसेच या ठिकाणी असलेल्या पारंपरिक रस्त्यासंबंधी पाहणी करताना नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अनेक त्रुटी ठेवल्याचेही त्यांनी सभगृहाच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या जलवाहिन्यांचा उल्लेख यात नसल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे हे लोक रस्ताही आपला खाजगी असल्याचे सांगतात आणि लोकांना घरे पाडणार असे सांगून धमक्याही देतात असे बोरकर यांनी सांगितले.