लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गोव्यात अनेक दिग्गज कलाकार घडले आणि त्यांनी राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी गुरुकुल पद्धतीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे लागणारी आर्थिक मदत करण्यास आपण तयार आहोत, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
शिरोडा येथे श्री शिवनाथ संस्थान व पंडित रघुनाथ फडके यांच्यावतीने आयोजित 'गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक जयंत मिरिंगकर, सत्कारमूर्ती ज्येष्ठ तबलावादक तुळशीदास नावेलकर, म्हाड्डू प्रभुगावकर उपस्थित होते.
फडके कुटुंबीय गायन-वादन-कीर्तन क्षेत्रात पारंगत असून, त्यांनी शिरोडा गावाला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. गजाननबुवा फडके यांनी कीर्तनाद्वारे, विष्णुबुवा फडके यांनी हार्मोनियम वादनातून, तर पंडित रघुनाथ फडके यांनी गायक-वादक म्हणून कलेची सेवा केली, असे शिरोडकर म्हणाले.
मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते पंडित तुळशीदास नावेलकर यांना सन्मानित करण्यात आले. शिरोडकर यांच्या हस्ते पंडित रघुनाथ फडके यांचा फडके कुटुंबीयांतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी मुग्धा गावकर, दत्तगुरू केळकर, ऋषिकेश साने आणि रघुनाथ फडके यांचा संगीत कार्यक्रम सादर झाला.
Web Summary : Minister Subhash Shirodkar pledged financial assistance for Gurukul education, honoring Pandit Jitendra Abhisheki's memory at a program in Shiroda. He lauded the Fadke family's contributions to music and honored Pandit Tulshidas Navelkar. A musical program highlighted the event.
Web Summary : मंत्री सुभाष शिरोडकर ने शिरोडा में एक कार्यक्रम में पंडित जितेंद्र अभिषेकी की स्मृति का सम्मान करते हुए गुरुकुल शिक्षा के लिए वित्तीय सहायता का वादा किया। उन्होंने फडके परिवार के संगीत में योगदान की सराहना की और पंडित तुलसीदास नावेलकर को सम्मानित किया। एक संगीत कार्यक्रम ने इस कार्यक्रम को उजागर किया।