व्यापाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 09:34 IST2026-04-05T09:33:24+5:302026-04-05T09:34:01+5:30

बैठकीच्या सुरुवातीला आमची व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घारू सावंत यांनी नव्या मार्केटमधील समस्यांच्या पाढा वाचला.

will find a solution to the problems of traders said cm pramod sawant | व्यापाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

व्यापाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फोंडा शहरातील व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याची आमच्या सरकारला आहे. सर्व समस्यांच्या मुळाशी जाऊन लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. फोंडा बिझनेसमन व अँड प्रोफेशनल्स जाण फोरमच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार दाजी साळकर, भाजप उमेदवार रितेश नाईक व सुनील देसाई उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला आमची व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घारू सावंत यांनी नव्या मार्केटमधील समस्यांच्या पाढा वाचला. त्यांच्या मते फुटपाथ व रस्त्याच्या आजूबाजूला काही विक्रेते बसून व्यापार करत असल्याने मार्केटमधील व्यापारांना व्यवसाय होत नाही. जे भाडे आकारण्यात येत आहे तेही परवडण्यासारखे नाही.

सद्‌गुरु गोवेकर यांनी भाजीविक्रेत्यांच्या समस्या मांडल्या. त्यांच्या मते भाजी मार्केटच्या बाहेर मोकळ्या जागेत काही भाजीविक्रेते बसतात. त्यामुळे आत बसलेल्या अधिकृत भाजी विक्रेत्यांना व्यवसाय होत नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुख्याधिकाऱ्यांना सांगून त्या व्यापाऱ्यांना तिथून हलविण्यात येईल असे वचन दिले.

बेतोडा वेंडर्स असोसिएशनचे महेश गायतोंडे यांनी बेतोडा औद्योगिक वसाहतमधील समस्या मांडल्या. क्रॉम्प्टन ग्रीव्हज सारखी कंपनी हलवण्यासंबंधी प्रयत्न होत आहेत. अशाने जे अवलंबून आहेत त्यांच्या व्यवसायावर गदा येईल. त्याचबरोबर वेडंरकडे असलेल्या कामगारावरही बेरोजगारीची वेळ येणार आहे. यावेळी आचारसंहिता संपल्यानंतर क्रॉम्प्टन संबंधित अधिकारी व वेडंर यांची संयुक्त बैठक मंत्रालयात घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

कृष्णा नाईक यांनी टॅक्सी चालकांच्या समस्या मांडल्या

सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर एकत्रितपणे बोलताना मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, उद्योग व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सरकार काम करत आहे. इथल्या उद्योग व्यावसायिकांच्या ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. जे काही स्थानिक पातळीवरील प्रश्न आहे ते स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यास प्राधान्य द्या. प्रशासन कमी पडल्यास आम्ही त्यावर निश्चित प्रयत्न करू.

Web Title : मुख्यमंत्री प्रमोद सावंत व्यापारियों की समस्याओं का समाधान करेंगे

Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने फोंडा के व्यापारियों को आश्वासन दिया कि सरकार उनकी समस्याओं का समाधान करेगी, जिसमें बाजार विक्रेता मुद्दे और औद्योगिक संपत्ति चिंताएं शामिल हैं। उन्होंने व्यापार-अनुकूल वातावरण बनाने और प्रशासनिक समर्थन के साथ स्थानीय मुद्दों को हल करने, समाधान खोजने के लिए बैठकें करने का वादा किया।

Web Title : CM Pramod Sawant to Resolve Traders' Issues in Fonda Soon

Web Summary : Chief Minister Pramod Sawant assured Fonda traders that the government will address their problems, including market vendor issues and industrial estate concerns. He pledged to create a business-friendly environment and resolve local issues with administrative support, holding meetings to find solutions.