राजधानी पणजीला जाण्याचा रस्ता कुठे आहे? अशी विचारणा करुन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले
By सूरज.नाईकपवार | Updated: February 18, 2024 23:11 IST2024-02-18T23:11:44+5:302024-02-18T23:11:58+5:30
ही सारी घटना सीसीटिव्ही कॅमेरावरही बंदिस्त झाला आहे.मायणा कुडतरी पोलिस सदया संशयितांचा शोध घेत आहे. सुनिता वेर्लेकर असे तक्ररादाराचे नाव आहे.

राजधानी पणजीला जाण्याचा रस्ता कुठे आहे? अशी विचारणा करुन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले
मडगाव: पणजी जाण्याचा रस्ता कुठून आहे अशी विचारणा करुन दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकाने एका महिलेच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा करण्याची घटना आज रविवारी गोव्यातील सासष्टी तालुक्यातील दवर्ली येथे घडली. ही सारी घटना सीसीटिव्ही कॅमेरावरही बंदिस्त झाला आहे.मायणा कुडतरी पोलिस सदया संशयितांचा शोध घेत आहे. सुनिता वेर्लेकर असे तक्ररादाराचे नाव आहे.
चोरीला गेलेल्या ऐवजाची किमंत अंदाचे १ लाख ५० हजार रुपये किमंतीच्या आसपास आहे .तक्रारदार महिला आपल्या घराच्या बाहेर झाडू मारीत होती. ते युवक दोन तीनदा तेथे येउनही गेले होते असेही पोलिसांना प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे. त्यांनी डोक्यावर हेल्मेटही घातली होती. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.